मुक्तपीठ टीम
पुणे अंदोलन अभियोग्यताधारकांच्या हक्कासाठी युवाशाही संघटनेच्या वतीने अंदोलन करण्यात येत आहे. शिक्षकभरतीला ४ वर्ष पूर्ण होत आले मात्र अद्यापही मुलाखतीसह यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. यामुळे युवाशाही संघटनेच्या वतीने उर्वरित आंदोलन करत पदभरतीस तत्काळ प्रारंभ करा अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
युवाशाही संघटनेचा आंदोलनाचा आज आठवा दिवस. डिसेंबर २०१७ शिक्षक पदभरती करीता अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. प्रत्यक्षात विनामुलाखत निवड यादी ही ९ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. शिक्षण आयुक्त यांनी पवित्र पोर्टलवरती १६ ऑगस्ट २०१९ मुलाखतीसह निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत वेळापत्रक जाहीर केले होते. आज दोन वर्षे पूर्ण झाले. अद्यापही मुलाखतीसह यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. अभियोग्यता चाचणीच्या तारखेपासून गेली चार वर्षे लाखो बेरोजगार अभियोग्यता धारकांची सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक पिळवणूक प्रशासन आणि सरकार करत आहे.
९ ऑगस्ट सोमवार २०२१ रोजी साधून शासन व प्रशासनाच्या निष्क्रीयतेला कंटाळून या युवकांनी निर्धार केलाय की, आता अश्वासन न देता लाखो बेरोजगार अभियोग्यता धारकांना केवळ न्याय हवा म्हणून प्रशासनास १६ ऑगस्ट २०१९ रोजी मुलाखतीसह प्रसिद्ध करण्यात येणारी निवड यादी २ वर्षांनंतर प्रसिध्द करण्यात आली नाही, तर आम्हला १७ ऑगस्ट २०२१ रोजी स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.