मुक्तपीठ टीम
आजच्या काळात YouTube हे रोजगार आणि कमाईचे प्रमुख साधन बनत आहे. भारतात प्रत्येक वयोगटातील लोकांचा कल हा यूट्युबकडे वळताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवीन लोक या वर्तुळात सामील होत आहेत. लोक यूट्यूबवर व्हिडीओ टाकून चांगली कमाई करत आहेत. समोर आलेल्या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, यूट्युबने भारताच्या जीडीपीमध्ये १० हजार कोटींहून अधिक योगदान दिले आहे, जे देशातील ७.५ लाख नोकऱ्यांच्या बरोबरीचे आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत यूट्युबचा मोलाचा वाटा!
भारतातील ४ हजार ५००हून अधिक यूट्युब चॅनेलचे १ दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत आणि भारतात वार्षिक एक लाख रुपयांहून अधिक कमाई करणार्या चॅनेलची संख्या २०२१मध्ये ६० टक्क्यांहून अधिक आहे. भारताच्या जीडीपीमध्ये १० हजार कोटींहून अधिक योगदान यूट्युबने दिले आहे. अलीकडच्या काळात यूट्यूब हे रोजगार संधीचे प्रमुख साधन म्हणून उदयास आले आहे. देशातील अनेक लोक यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करून लाखोंची कमाई करत आहेत.
यूट्युबद्वारे जीडीपीत झालेली लक्षणीय वाढ! जाणून घ्या सविस्तर
- कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात यूट्युबर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
- यूट्युबने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये यूट्युबचे योगदान ६ हजार ८०० कोटी रुपये होते.
- त्याच वेळी, ६ लाख ८३ हजार ९०० लोक यूट्यूबच्या माध्यमातून पूर्णवेळ जॉईन होऊन नोकरीसारखे पैसे कमवत आहेत.
- आजच्या काळात ‘YouTube’हे कमाईचे एक चांगले स्त्रोत!
- यूट्युब देशात कमाईचा एक चांगला स्रोत बनत आहे.
- व्हिडीओ बनवून लोक यूट्युबवर चांगली कमाई करत आहेत.
- यूट्युबवर जाहिरातींमुळेही चांगली कमाई करता येते.
- यासाठी कंपनीने यूट्यूब चॅनलवर जाहिराती देणे आवश्यक आहे. तसेच, जेव्हा चॅनेलची कमाई होऊ लागते, तेव्हा जाहिराती येऊ लागतात.