मुक्तपीठ टीम
दुबई विमानतळावरील प्रवासासाठी प्रवाशांना आता लांबलचक लाइनमधून मुक्तता मिळणार आहे. एयरपोर्ट अथॉरिटीने लेटेस्ट तंत्रज्ञान वापरण्यास सुरवात केली आहे. जे पासपोर्ट ऐवजी आपल्या चेहऱ्यानेच आपल्याला ओळखणार आहे. याशिवाय आयआरआयएसद्वारे प्रवाशाची ओळखही काढली जाईल. या दोघांच्या उपयोगानेच ओळख पूर्ण केली जाईल. एयरपोर्ट अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रक्रिया बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बायोमेट्रिक पॅसेंजर जर्नी असे या प्रकल्पाचे नाव आहे. दुबई एयरपोर्ट अथॉरिटीच्यामते यामुळे प्रवाशां वेळ वाचेलच, पण सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाईल. कोरोना काळात स्पर्शमुक्त प्रवास आवश्यक आहे. या नव्या सुविधेमुळे प्रवासी यापुढे विमान कंपन्यांशी संपर्क साधणार नाहीत. यासाठी १२२ स्मार्ट गेट बनविण्यात आले आहेत. कोणत्याही गेटवर त्यांचे ५ ते ९ सेकंदच जातील.
दुबई विमानतळाचे संचालक मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मायरी म्हणाले, “आम्ही अमिराती प्रशासन आणि इतर भागीदारांच्या मदतीने ही प्रक्रिया सुरू केली आहे. विमानतळावर प्रवाशांना अडचण येऊ नये म्हणून आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
जेव्हा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी येईल तेव्हा चेहरा आणि आयआरआयएस ओळख देऊन चेक इन केले जाईल. डेटा संकलित केला जाईल. यानंतर, तो पास करेल त्या सर्व स्मार्ट गेट्स, सर्व बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा डेटा जुळेल आणि गेट उघडेल.
पाहा व्हिडीओ: