Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माविमच्या माध्यमातून २ कोटी महिलांच्या सक्षमीकरणाचे काम सुरु! – यशोमती ठाकूर

माविमच्यावतीने आयोजित प्रेरणादायी महिलांच्या सन्मान सोहळ्यात घोषणा

April 13, 2022
in घडलं-बिघडलं
0
Mavim

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडीचे शासन माविमच्या माध्यमातून २ कोटी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे काम करीत असून, येत्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून २ कोटी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असा विश्वास आज महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने सह्याद्री अतिथिगृह, येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित “सन्मान प्रेरणादायी महिलांचा” या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Image

या कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माविमच्या व्यावस्थामपकीय संचालक श्रद्धा जोशी आणि सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर समीर राऊत आदी उपस्थित होते.

 

मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या ,महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविम नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, बचत गटामधील महिलामध्ये उद्योगजकतेचा विकास व्हावा यासाठी माविम अनेक योजना राबवित आहे. सध्याच्या काळात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक सक्षमीकरण नाही, तर त्यांचं सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झालं पाहिजे. त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.

Image

ज्योती ठाकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी महत्वाची यंत्रणा आहे. सध्या राज्यात सुमारे दीड लाख बचतगटांची स्थापना ‘माविम’च्या वतीने करण्यात आली आहे. महामंडळाने आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत १.५० लाख हजार बचतगटाची निर्मिती करुन १७.५१ लाख महिलांचे संघटन उभे केले असून त्यापैकी जवळजवळ ८.५० लाख महिला विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. माविमने बचत गटांचे महाराष्ट्रामध्ये ३६१ फेडरेशन नोंदणीकृत केले आहे. यापैकी ८०% फेडरेशन हे स्वबळावर सुरु आहेत.

 

श्रीमती पेडणेकर म्हणाल्या, माविम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे काम करते. महिलांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते व देश सक्षम होतो. या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात माविममार्फत कार्यक्षेत्रामध्ये महिलांच्या सुरक्षततेसाठी “सेफ्टी ऑडीट” राबविण्यात आले. याची सुरुवात मुंबई शहरापासून केली जाणार आहे. मविम स्टाफ व महिलांसाठी अक्षरा या स्वयंसेवी संस्थेच्या साधन व्यक्ती मार्फत सफेटी ऑडिट या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी .या कार्यक्रमाच्या निमित्ताने “महिला सेफ्टी ऑडीट – (Women Safety Audit)” प्रशिक्षण पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Mavim

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश सावंत यांनी “महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांच्या विचारांबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रति विभाग २ प्रमाणे १२ यशस्वी महिला उद्योजक / सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळी मान्य वराच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पृथ्वी पाटील, पालघरच्या लिला गजरा, बीडच्या प्रतिभा सांगळे, अकोल्याच्या संजीवनी ताडेगांवकर, अमरावतीच्या कल्पना किशोर दिवे, मनुताई सुर्यभान वरठी, चंद्रपूरच्या न्या. निकिशा अशरफखान पठाण, भांडाराच्या सुषमा केशव पवार, धुळ्याच्या मिना हिरारलाल भोसले, पुण्याच्या वनिता शिरिष हजारे, श्रध्दार कांडोळे, यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले तर आभारप्रदर्शन व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी केले.


Tags: MAVIMmumbaiwomensYashomati Thakurमाविमयशोमती ठाकूरसन्मान प्रेरणादायी महिलांचा
Previous Post

केंद्र सरकारच्या प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मल्टी टास्किंग स्टाफची भरती

Next Post

महाराष्ट्रात दोन वर्षात प्रत्येक घरी नळाने पाणी देण्याचं लक्ष्य!

Next Post
jal jeevan mission meeting

महाराष्ट्रात दोन वर्षात प्रत्येक घरी नळाने पाणी देण्याचं लक्ष्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!