मुक्तपीठ टीम
संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजावला आहे. या संकट काळात जागतिक कल्याण व वातावरणाचे शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने जय श्री राम सेवा समितीने वातावरण शुद्धीसाठी फिरत्या यज्ञाचे आयोजन केले आहे. हा फिरता यज्ञ असलेली गाडी मुंबईभर फिरणार आहे.
अनोख्या फिरत्या यज्ञाबद्दल…
• जय श्री राम सेवा समितीचे उपाध्यक्ष आणि मुंबईचे माजी उप महापौर बाबूभाई भवानजी यांनी या फिरत्या यज्ञाबद्दलची भूमिका मांडली.
• आपली परंपरा ही अध्यात्मिक विज्ञानावर आधारीत आहे.
• त्यात प्रत्येक समस्यांशी लढण्याची क्षमता आहे.
• जसे हवनातून निघणाऱ्या धूरामुळे वातावरण शुद्ध होते, तसेच यज्ञ दरम्यान उच्चारलेल्या मंत्रांमुळे अनेक समस्या दूर होतात.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड येथे वातावरण शुद्धिकरणाचे उद्दिष्ट समोर ठेऊन यज्ञाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपाच्या स्थानिक नगरसेविका दक्षा पटेल देखील उपस्थित होत्या.
हा यज्ञ ट्रकमध्ये होत असून त्याला संपूर्ण मालाड परिसरात फिरवण्यात आले. तसेच असे समितीकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की, अशाप्रकारच्या यंज्ञांचे आयोजन संपूर्ण मुंबईत केले जाईल. तसेच असे यज्ञाने आयोजन करण्याची इच्छा असणाऱ्यांनी बाबूभाई भवानजी यांच्या ९८१९१५१८२८ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.