मुक्तपीठ टीम
शाओमी २०२१ मध्ये बरेच नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. यात शाओमीच्या लवकरच लॉन्च होणाऱ्या स्मार्ट टिव्हीचा समावेश आहे. शाओमी रेडमी कंपनीचा ६५ इंचाचा टिव्ही मार्च मध्ये लॉन्च करणार आहे. तसेच ही भारतातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त ६५ इंचाची स्मार्ट टिव्ही असेल, असा दावा कंपनीकडून केला जात आहे.
मुकुल शर्मा यांनी सांगितले, “रेडमी स्मार्ट टिव्ही ५५ इंच आणि ६५ इंचच्या पर्यायामध्ये उपलब्ध असेल.”
६५ इंचाच्या टिव्हीची मागणी वाढणार
मार्केटमध्ये ६५ इंचाच्या टिव्हीची मागणी सध्या फार कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची किंमत आहे. यासाठीच आता रेडमी स्वस्त किमतीत त्यांचा टिव्ही बाजारात आणणार आहे. याच्या कमी किमतीमुळे ६५ इंचाच्या टीव्हीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या भारतात ६५ इंचाचा शाओमी एमआय टिव्ही ४एक्स उपलब्ध आहे. ज्याची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे.
गेल्यावर्षी शाओमी कंपनीने रेडमी स्मार्ट टिव्ही एक्स६५ चीन मध्ये लॉन्च केला. हा टिव्ही चीनमध्ये ५०, ५५, ६५ इंच स्क्रीन पर्यायामध्ये लॉन्च केला होता.
फिचर्स
- रेडमी स्मार्ट टिव्ही एक्स सीरीजला ४के यूएचडी रेझॉल्यूशनमध्ये आणेल.
- स्मार्ट टिव्हीमध्ये १२.५ डब्लू स्पीकर आहेत.
- डॉलबी ऑडिओ आणि डीटीएस एचडी कॅपेबिलिटी दिली गेली आहे.
- टिव्हीमध्ये स्लिम आणि बेजेल-लेस डिस्प्ले असेल.
- स्मार्ट टिव्हीची स्क्रीन टू बॉडी रेशोमध्ये ९७% आहे.
- यासोबतच यात वॉइज कमांडसाठी फार फिल्ड वॉइज रेकगनायजेशन फिचर दिला गेला आहे.