मुक्तपीठ टीम
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने जगातील सर्वात प्रगत FCEV टोयोटा मिराईचा अभ्यास आणि मूल्यांकन करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा उद्देश भारतीय परिस्थितीत हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा अभ्यास करणे हा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजन आधारित इंधन सेल इलेक्ट्रिक वाहनांच्या पायलट प्रकल्पाचे बुधवारी उद्घाटन केले. या प्रकल्पातील टोयोटा मिराई कारची प्रात्यक्षिकं झाली. या कारनं याआधीच अवघ्या पाच मिनिटे भरलेल्या इंधनाच्या बळावर १ हजार ३६० किलोमीटरचा टप्पा पार करण्याचा विश्वविक्रम केला आहे.
Toyota Kirloskar Motor ने इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) च्या सहकार्याने जगातील सर्वात प्रगत FCEV Toyota Mirai चा अभ्यास आणि मूल्यांकन करण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा उद्देश भारतीय रस्ते आणि हवामानात हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचा अभ्यास करण्याचा आहे.
हायड्रोजन, FCEV तंत्रज्ञान आणि भारतातील हायड्रोजन आधारित समाजाला मदत करण्यासाठी त्याचे फायदे याबद्दल जागरुकता पसरवण्याच्या उद्देशाने हा देशातील पहिला प्रकारचा प्रकल्प आहे.
नव्या इंधनासाठी गडकरींचे प्रयत्न
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे सातत्यानं नव्या इंधनासाठी प्रयत्न करीत आहेत. याआधीच एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, या प्रकारची कार असणे शक्य आहे हे लोकांना दाखवण्यासाठी मी लवकरच हायड्रोजन कार लाँच करणार आहे.
ग्रीन हायड्रोजनचालित वाहन योजना
- सरकार ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहतूक चालवण्याचा विचार करत आहेत.
- कार, बस, ट्रक सर्व काही ग्रीन हायड्रोजनवर चालवायचे आहे.
- त्यासाठी नदी-नाल्यांमध्ये पडणारे घाण पाणी वापरावे, त्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करावे. अशी योजना आखली जात आहे.
टोयोटाच्या हायड्रोजन कार मिराईचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
टोयोटाच्या फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल मिराईने ऑक्टोबरमध्ये जबरदस्त विक्रम नोंदवला आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या २०२१ टोयोटा मिराईने एकदाच इंधन भल्यानंतर पुन्हा इंधन भरल्याशिवाय इंधन सेल वाहनाने सर्वात लांब अंतराचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे.
टोयोटा मिराईने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला: यावेळी ऑटोमोटिव्ह उद्योगात बॅटरी इलेक्ट्रिक वाहने सतत चर्चेत असतात. तथापि, जपानची आघाडीची वाहन निर्माता कंपनी टोयोटाने आपल्या इंधन सेल इलेक्ट्रिक वाहन मिराईसह एक जबरदस्त पराक्रम केला आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या २०२१ टोयोटा मिरायने इंधन भरल्याशिवाय इंधन सेल वाहनाने सर्वात लांब अंतराचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे.
टोयोटाच्या हायड्रोजन-चालित मिराईने दक्षिण कॅलिफोर्नियाच्या राऊंडट्रिप टूरमध्ये एकाच, पाच मिनिटांच्या पूर्ण फिलिंगवर १३६० किमी कव्हर केले. हा विक्रम पूर्ण करण्यासाठी दोन दिवस लागले. विक्रम करण्याच्या प्रयत्नावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने बारकाईने लक्ष ठेवले होते. ५ मिनिटांत संपूर्ण टाकीमध्ये इंधन भरल्यानंतर, मिराईची टाकी सील करण्यात आली आणि प्रवासाच्या सुरूवातीस आणि शेवटी दोन्ही अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. २०२१ Toyota Mirai हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी व्यावसायिक ड्रायव्हर वेन गेर्डेस आणि सह-ड्रायव्हर बॉब विंगर यांनी चालवला होता.
मिराईने एकूण ५.६५ किलो हायड्रोजनचा वापर केला आणि प्रभावी १५२ MPGe कामगिरी नोंदवली. या वेळी या कारने केवळ उत्सर्जन म्हणून पाणी सोडले. टोयोटा मिराईने संपूर्ण प्रवासात इंधन न भरता एकूण १२ हायड्रोजन स्टेशन पार केले. दोन दिवसांच्या चाचणी दरम्यान, याने शून्य किलोग्राम CO2 (कार्बन-डाय-ऑक्साइड) सोडला. तर मानक अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) असलेल्या दुसर्या वाहनाने इतके अंतर पार करताना सुमारे ३०० किलो CO2 उत्सर्जित केला असेल.