सुश्रुषा जाधव
२९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिवस म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस लोकांना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. सध्या असंतुलित जीवनशैलीमुळे हृदयरोग्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जागतिक हृदय दिवसचा निमित्तानी आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स बद्दल माहिती देत आहोत, ज्या वापरून तुम्ही तुमचे हृदय निरोगी ठेवू शकता.
ह्रदयासाठी टिप्स – १
पहिली गोष्ट जास्त फॅट्स युक्त अन्न खाऊ नये. जास्त फॅट्स युक्त अन्न शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते. कोलेस्टेरॉल रक्तवाहिनीमध्ये जमा होतो आणि अडथळे निर्माण करतो.
ह्रदयासाठी टिप्स – २
प्रोटिनयुक्त योग्य आहार घ्यावे. एखाद्या व्यक्तीचे वजन जितके असते, तितकेच ग्रॅम प्रोटिन दररोज आहारात घेणे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचे वजन ६० किलो असेल तर त्याने दररोज ६० ग्रॅम प्रोटिनयुक्त आहार घेणे आवश्यक आहे.
ह्रदयासाठी टिप्स – ३
आपण दैनंदिन दिनक्रमात ४० मिनिटांच्या कार्डिओ व्यायामाचा समावेश करावा . यामध्ये तुम्ही दोरी उड्या, धावणे, पोहणे किंवा सायकलिंग यासारखे व्यायाम करू शकता.
ह्रदयासाठी टिप्स – ४
हृदय निरोगी ठेवण्यासाठी फळांचे सेवन फायदेशीर आहे. दररोज एक सफरचंद खाणे खूप फायदेशीर आहे.
ह्रदयासाठी टिप्स – ५
फायबरयुक्त अन्न हृदयासाठी फायदेशीर आहे.
ह्रदयासाठी टिप्स – ६
हे लक्षात ठेवा की संध्याकाळी ६ वाजल्यानंतर जास्त तेलकट अन्न खाणे टाळावे.
ह्रदयासाठी टिप्स – ७
जर तुम्हाला मधुमेह असेल तर रक्तातील साखरेचे कडक नियंत्रण हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
ह्रदयासाठी टिप्स – ८
शक्य तितका ताण कमी करा. उगाच मनावर ताण घेऊ नका. त्यापेक्षा तो मोकळा करा.
ह्रदयासाठी टिप्स – ९
रोज मेडिटेशन, योगासारख्या मार्गांनी मनातील तणावाचा निचरा करण्याचा प्रयत्न करा.
ह्रदयासाठी टिप्स – १०
हृदयाशी संबंधित सर्व वैद्यकीय तपासणी देखील वेळोवेळी केल्या पाहिजेत.