मुक्तपीठ टीम
महिला धोरण हा एक क्रांतिकारी विचार होता जो शरद पवारांनी मांडला व मंजूर करुन घेतला याची आठवण आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महिला धोरणाला आज २७ वर्षे पुर्ण होत असून खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट करत आपले विचार मांडले आहेत.
महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधीची कवाडे खुली करणाऱ्या महिला धोरणास आज २७ वर्षे पुर्ण होत आहेत.महिला धोरण हा एक क्रांतिकारी विचार होता जो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मांडला व मंजूर करुन घेतला. pic.twitter.com/H80s4vitur
— Supriya Sule (@supriya_sule) June 22, 2021
राज्याच्या कानाकोपऱ्यात आज महिला अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करताना दिसत आहेत. शासन-प्रशासन चालवित आहेत, ही अतिशय आश्वासक बाब असून हा प्रवाह असाच अखंड सुरु राहील असा विश्वासही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधीची कवाडे खुली करणाऱ्या महिला धोरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत महिलांच्या कार्याची स्तुती केली आहे.