मुक्तपीठ टीम
सीआरपीएफ कोब्रा कमांडो पथकात आता महिलांनाही संधी मिळणार आहे. भरतीनंतर प्रशिक्षण झाले की महिलाही नक्षलवाद्यांशी लढणार आहेत. कोब्रा कमांडो तुकड्या नक्षलग्रस्त राज्यात तैनात करण्यात येतात.
केंद्रीय राखीव पोलिस दल म्हणजेच सीआरपीएफ जंगलातील युद्धामध्ये तज्ज्ञ मानले जाते. ‘कोब्रा कमांडो बटालियन’ मध्ये आता महिलांचा समावेश करण्याची तयारी केली जात आहे. २००९ मध्ये गुप्तचर माहितीवर आधारित जंगलातील युद्ध कारवायांसाठी ‘कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट अॅक्शन’ (कोब्रा) च्या १२,००० जवानांच्या दहा तुकड्यांची स्थापना केली गेली.
सीआरपीएफ प्रमुख ए.पी.माहेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही आता कोब्रामध्ये महिलांचा समावेश करण्याबाबत विचार करत आहोत.” देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी बहुतेक कोब्रा कमांडो तुकड्या नक्षलग्रस्त राज्यात तैनात आहेत.
१९८६ मध्ये सर्वप्रथम सीआरपीएफमध्ये महिला बटालियनची स्थापना झाली होती. सैन्यात सध्या अशा सहा तुकड्या आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सीआरपीएफची स्थापना करण्यात आली होती. त्याच वेळी पहिली महिला कोब्रा कमांडो बटालियन तयार झाली. सीआरपीएफमध्ये सध्या सुमारे ३.२५ लाख कर्मचारी आहेत. हे देशातील सर्वात मोठे अर्धसैनिक दल आहे.
पाहा व्हिडीओ: