मुक्तपीठ टीम
काही दिवसांपूर्वी बंगालच्या वर्तमानपत्रांमध्ये पंतप्रधान आवास योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एका महिलेचाही फोटो होता. जाहिरातीत लिहिले होते, “स्वावलंबी भारत, स्वावलंबी बंगाल, मला स्वतःचे घर मिळाले!” पण नंतर पत्रकारांनी ज्या महिलेचा फोटो छापला गेला तिचा शोध घेतला तेव्हा ती भाड्याच्या घरात राहते असे उघड झाले. तिला पेपरला आपला फोटो आलाच कसा असा प्रश्न पडला होता. घर मिळाल्याची ती जाहिरात असल्याचे कळताच, तिने स्पष्ट शब्दात इंकार केला.
लक्ष्मी देवी असे त्या सरकारी जाहिरात घोषित महिला लाभार्थीचे नाव असून ती प्रत्यक्षात भाड्याच्या घरात राहते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोणतेही घर मिळाल्याचे स्पष्टपणे नकारले आहे.
मूळच्या बिहारच्या छपरा जिल्ह्यातील रहिवासी लक्ष्मी देवी कोलकाताच्या बहु बाजारात राहतात. त्या म्हणतात की त्यांच्याकडे गावात जमीन नाही आणि बंगालमध्येही त्यांची जमीन नाही. त्या कोलकात्यात भाड्याच्या घरात राहते. जेव्हा त्यांच्याशी या फोटोविषयी बोललं गेलं तेव्हा त्या म्हणाल्या की मला त्याबद्दल काहीच माहित नाही. मी भाड्याच्या घरात राहते. जेव्हा लक्ष्मीदेवींना कळले की त्यांचा फोटो वर्तमानपत्रात छापला गेला आहे, तेव्हा त्यांना प्रश्न पडला की त्यांचा फोटो वर्तमानपत्रात का छापला गेला?
लक्ष्मीदेवी सांगतात की, फोटो न विचारताच जाहिरातीमध्ये वापरला गेला आहे. माझा फोटो कोणी घेतला हे मला माहित नाही. एक दिवस मी झोपून उठले तेव्हा मला प्रत्येकजण म्हणत होते तुमचा फोटो वर्तमानपत्रात आला आहे. मला या जाहिरातीबद्दल काही माहिती नाही.
बोगस लाभार्थी शेतकरीही!काही
दिवसांपूर्वी पंजाबमध्ये भाजपाने एक जाहिरात प्रसारीत केली होती. पंजाबचे शेतकरी एमएसपीवर केल्या जाणाऱ्या खरेदीने खूश आहेत. पण जाहिरातीमध्ये वापरलेले छायाचित्र पंजाबी चित्रपट अभिनेता हरप्रीत सिंग यांचे होते जे स्वतः शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी आक्षेप घेताच पार्टीने ती जाहिरातच गायब केली.