Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजपा सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का ?

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचा भाजपाला प्रश्न

October 28, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sardar udham

मुक्तपीठ टीम 

‘सरदार उधम’ चित्रपटात ब्रिटिशांबद्दल द्वेष दाखवण्यात आला असल्याचे कारण देत ज्युरींनी हा चित्रपट ऑस्कर नामांकनातून वगळणे हा १३० कोटी भारतीयांचा अपमान आहे. सरदार उधमसिंह हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या जाज्वल्य इतिसाहातील एक सोनेरी अध्याय आहे. ब्रिटींशांबद्दलचा कळवळा दाखवून उधमसिंह यांच्या देशप्रेमाचा, त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा हा अपमानच आहे. देशप्रेमाचे सतत उमाळे येणारे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार या विषयावर गप्प का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

 

 

यासंदर्भात बोलताना लोंढे पुढे म्हणाले की, सरदार उधम चित्रपट हा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी वगळणे हे फक्त चित्रपटापुरते मर्यादित नसून तो समस्त भारतीय जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा चित्रपट जालियनवाला बाग घटनेवर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका निधड्या छातीच्या नायकावर हा चित्रपट बनवलेला आहे. चित्रपटाची निमिर्तीमुल्ये, दर्जा यात तो कुठे कमी पडल्याचे कारण नाही फक्त इंग्रजांबद्दलचा द्वेष हे ज्युरींचे कारण अत्यंत हास्यास्पद आहे.

 

 

जालीयनवाला बागेत जनरल डायरने शेकडो निरपराध व निष्पाप लोकांवर गोळ्या घालून नरसंहार केला. जालीयनवाला बाग नरसंहार हा भारतीयांच्या मनातील भळभळती जखम आहे. हे घडवून आणणाऱ्या जनरल डायरला गोळ्या घालून उधमसिंह यांनी या घटनेचा बदला घेतला. भारताच्या स्वातंत्र्यांसाठी लढताना ब्रिटिश सत्तेने अनन्वीत छळ केले. जालीयनवाला बाग हे त्याचेच एक उदाहरण आहे. स्वातंत्र्यासाठी हसत हसत सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांपैकी सरदार उधमसिंह हे एक आहेत. या चित्रटातून देशाभिमान जागृत होत असताना आजही ब्रिटिशांच्या अपमानाचे कारण पुढे केले जात असेल तर ते अत्यंत निषेधार्ह आहे. सरदार उधमसिंह जेलमध्ये असताना राम मोहम्मद सिंह आझाद असे नाम ठेवून सामाजिक एकतेचे प्रतिक बनले होते. या महान देशभक्ताची महती सांगणाऱ्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय  सन्मानापासून रोखणे हे कोत्या मनोवृत्तीचे दर्शन असून देशप्रमाचे गोडवे गाणारा भाजपा यावर गप्प आहे हे मनाला वेदना देणारे व तेवढेच आश्चर्याचे वाटते, असे लोंढे म्हणाले.


Tags: Atul LondheBJPfilm federation of indiaJallianwala Baghsardar uddhamअतुल लोंढेजालियनवाला बागफिल्म फेडरेशन ऑफ इंडियाभाजपासरदार उधम
Previous Post

बाळासाहेबांची आठवण करुन देत समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र…

Next Post

मुंबईच्या समीर वानखेडे प्रकरणात आता बिहारचे माजी मुख्यमंत्री उतरले!

Next Post
bihar ex cm

मुंबईच्या समीर वानखेडे प्रकरणात आता बिहारचे माजी मुख्यमंत्री उतरले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!