मुक्तपीठ टीम
शिवसेने माजी आमदार सुभाष साबणे हे सोमवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाकडून त्यांना देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिलं जाणार आहे. सुभाष साबणे यांना शिवसेना सोडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली अश्रू अनावर झाले. शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करतानाही त्यांनी “बाळासाहेबांनी खूप दिलं…उद्धवसाहेबांनी खूप दिलं!” असं कृतज्ञतेनं सांगितलं. साबणे यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांच्या प्रभावक्षेत्रातील शिवसैनिकांची होणारी घुसमटच मांडली असल्याचे मानले जाते.
भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे आले होते. तिथं त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांची भेट घेतली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर आरोप
- मी १९८४ पासन आज इतके वर्ष मी शिवसेनेमध्ये घालवली.
- आज अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मला शिवसेना सोडावी लागत आहे.
- शिवसेना सोडताना अतिशय वाईट वाटत आहे.
- बाळासाहेब ठाकरे यांनीमला खूप प्रेम दिल जे मागितलं ते दिल उद्धव साहेबांनी पण खूप दिलं. यावेळी ते भावूक झाले होते.
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस’ डावपेचांमध्ये मास्टर! उद्धव ठाकरे सज्जन!!
- आयुष्यात जय पराजय होत राहतो पण माझ्या कार्यकर्त्याला बुटाने मारण्याचा जो प्रकार झाला त्या मनाला वेदना देऊन गेल्या.
राज्यात काँग्रेस संपली होती. - उद्धव साहेबांमुळे तुम्ही सत्तेवर आलात आणि तुम्ही आम्हाला विसरता.
- आमच्या नेत्यांचे फोटो बॅनर वर देखील लावले जात नाहीत.
- त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याने काळे झेंडे दाखवले तर त्यांना बुटासह मारण्याचा प्रयत्न झाला.
- आमच्या सदस्यांना डीपीडीसी मधून निधी दिला जात नाही.
- शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण करत आहेत.
- उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत त्यांना डावपेच माहीत नाहीत.
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यात मास्टर झालेली लोक आहेत.
- पायातपाय घालण्यात आणि राजकारणात हे पीएचडी झालेली माणस आहेत.
- शिवसेनेचे यामुळे मोठं नुकसान आहे.
शिवसेनेने आता या आघाडीतून बाहेर यावं
- माझ्यासारखी परिस्थिती अनेकांची आहे.
- माझ्यासारख्या अनेक लोकांची इच्छा आहे की शिवसेनेने आता या महाविकास आघाडीतून बाहेर यावं.
- आमदार आणि खासदारांची हीच इच्छा आहे.
- मी जर सहन करून बसलो असतो तर आता काँग्रेसला मतदान मागितलं असतं आणि मग २०२४ ला कुणासाठी मतदान मागितलं असतं.
- आज पंज्याला मतदान द्या अस म्हणायचं आणि मग २०२४ ला कुणाला मतदान द्या म्हणून सांगायचं?