मुक्तपीठ टीम
आरआरबी- एनटीपीसी निकालात झालेल्या हेराफेरीच्या विरोधात बिहारमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. बुधवारी संतप्त विद्यार्थ्यांनी गया जंक्शन येथे ट्रेन पेटवून दिली. त्यानंतर रेल्वेने भरती परीक्षा पुढे ढकलत चौकशी समिती स्थापन केली आहे.मात्र या आंदोलनामगे नेमकं कारण काय आहे हे जाणून घेऊया.
रेल्वे भरतीच्या या पदांसाठी गदारोळ
- रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने फेब्रुवारी २०१९ मध्ये आपली अधिसूचना जारी केली होती आणि जानेवारी २०१९ मध्ये नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजसाठी ३५ हजार २७७ पदांची घोषणा केली होती.
- त्यात पदवी आणि पदवीपूर्व अशा दोन्ही पदांचा समावेश होता.
- या अर्जाद्वारे, रेल्वेने विविध झोनसाठी कनिष्ठ लिपिक, ट्रेन असिस्टंट, गार्ड, टाइम किपर ते स्टेशन मास्तर या पदांसाठी भरती काढली.
- या भरती परीक्षेतील १० हजार ६२८ पदांसाठी किमान पात्रता बारावी आहे.
रेल्वे भरती परीक्षा कशी झाली?
- रेल्वेच्या या ३५ हजार पदांसाठी सुमारे १.२५ कोटी उमेदवारांनी अर्ज केले होते.
- रेल्वेने सर्व उमेदवारांच्या स्क्रिनिंग प्रक्रियेसाठी एक सामायिक चाचणी घेतली आहे, ज्याला कम्युटर बेस्ड टेस्ट-१ म्हणतात.
- रेल्वेने जानेवारी २०१९ मध्ये या पदांची घोषणा केली होती, परीक्षेची तात्पुरती तारीख सप्टेंबर २०१९ होती, परंतु ती मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
- यानंतर कोरोनामुळे ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली आणि शेवटी संगणक आधारित चाचणी-१ (CTBT-1) परीक्षा डिसेंबर २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत ७ टप्प्यात घेण्यात आली.
- CTBT-1 परीक्षेचा निकाल १४-१५ जानेवारी २०२२ रोजी जाहीर झाला.
उमेदवारांच्या विरोधानंतर रेल्वेने परीक्षा पुढे ढकलल्या
- रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या (RRB) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजच्या (NTPC) ३५ हजार पदांसाठी परीक्षेची पुढील फेरी अर्थात संगणक आधारित चाचणी-2 (CTBT-2) १५ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार होती, परंतु रेल्वे उमेदवारांना परवानगी दिली नाही.
- विरोधाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली.
- निकालाबाबत उमेदवारांच्या चिंता आणि शंकांचे निरसन करण्यासाठी रेल्वेने उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे.
- उमेदवारांना त्यांच्या तक्रारी आणि सूचना नोंदवण्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत सुमारे ३ आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
- संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ही समिती ४ मार्च रोजी आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करणार आहे.
- उमेदवार १६ फेब्रुवारीपर्यंत rrbcommittee@railnet.gov.in या ईमेलवर त्यांच्या तक्रारी आणि सूचना नोंदवू शकतात.
- या परीक्षेशिवाय, रेल्वेने २३ फेब्रुवारी रोजी होणारी रेल्वे भरती बोर्ड (RRB) गट डी (RRC-01/2019) संगणक आधारित चाचणी-1 (CTBT-1) परीक्षा देखील पुढे ढकलली आहे.
रेल्वे भरतीविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर का उतरले?
- रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (RRB-NTPC) परीक्षेत हेराफेरीचा आरोप करत बिहारमधील हजारो उमेदवार सोमवारी रस्त्यावर उतरले आणि रेल्वे रुळांवर बसून अनेक ठिकाणी ट्रेन रोखल्या.
- २६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही उमेदवारांचा विरोध सुरूच होता आणि त्यांनी गयामध्ये रिकामी ट्रेन पेटवली.
- अशा परिस्थितीत हजारो विद्यार्थी रेल्वे भरतीच्या परीक्षेबद्दल नाराज का आहेत ते समजून घेऊया.
या ३५ हजार पदांवर अधिकाधिक लोकांना स्पर्धा करण्याची संधी देण्यासाठी रेल्वेने यावेळी नियम केला होता की, दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी अर्थात सीटीबीटी-२ परिक्षेसाठी उपलब्ध असलेल्या पदांपेक्षा २० पट अधिक उमेदवार प्रत्येक स्तरासाठी निवडले जातील.
यापूर्वी २०१६ मध्ये, रेल्वेच्या भरतीसाठी, रिक्त जागांपेक्षा १५ पट अधिक उमेदवार निवडले गेले होते. त्याआधी रेल्वे परीक्षांमध्ये रिक्त जागांपेक्षा १० पट अधिक विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्याचा नियम होता.
म्हणूनच यावेळी पहिल्या फेरीच्या परीक्षेनंतर एकूण ३५ हजार २७७ रिक्त जागांसाठी ७ लाखांहून अधिक अर्जदार निवडले गेले, परंतु प्रत्यक्षात दुसऱ्या फेरीसाठी निवडलेल्या उमेदवारांची संख्या ७ लाख नसून ३.८४ लाख आहे.
हेच उमेदवारांच्या नाराजीचे सर्वात मोठे कारण आहे. उमेदवारांचा आरोप आहे की रेल्वेने आपल्या आश्वासनाचे पालन केले नाही आणि चाचणीच्या दुसऱ्या फेरीसाठी निवडलेल्या उमेदवारांची संख्या ७ लाखांवरून केवळ ३.८४ लाखांपर्यंत कमी केली आहे.
शॉर्ट लिस्टची प्रक्रिया अर्जांवर अवलंबून असेल, असे रेल्वेने सांगितले. याचा अर्थ असा की जर अर्जदार A ने लेव्हल २ आणि लेव्हल ५ या दोन्हीसाठी अर्ज केला असेल, तर उपलब्ध पदांच्या २० पट संख्या अर्जदारांच्या शॉर्टलिस्टिंगवर आधारित असेल, आणि त्या व्यक्तीचा स्कोअर दोन्ही श्रेणींमध्ये मोजला जाईल.
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची संख्या कमी केल्याचा निषेध
उमेदवारांचा आरोप आहे की रेल्वेने आपल्या अधिसूचनेत RRB-NTPC परीक्षेतील पहिल्या टप्प्यानंतर सुमारे ७ लाख विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यास सांगितले होते, परंतु शेवटी केवळ ३.८४ लाख अर्जदारांचीच दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी निवड झाली.
यासोबतच, शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची संख्या कमी झाल्यामुळे कट ऑफ मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोपही अर्जदारांनी केला आहे.
त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत निवड होणारे अनेक उमेदवार जास्त कट ऑफमुळे प्रक्रियेबाहेर पडले आहेत.
परीक्षा दोन टप्प्यात घेण्यास विरोध
- अर्जदारांच्या विरोधाचे दुसरे कारण म्हणजे रेल्वे भरती मंडळाची गट-डी परीक्षा दोन टप्प्यात घेणे.
- यापूर्वी गट-डीसाठी एकाच टप्प्यात परीक्षा घेतली जात होती.
- गट-डी परीक्षा दोन टप्प्यात घेऊन सरकार भरती प्रक्रिया दीर्घकाळ पुढे ढकलू इच्छित असल्याचा अर्जदारांचा आरोप आहे.
- यासोबतच दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेच्या बहाण्याने विद्यार्थ्यांकडून जास्तीचे अर्ज शुल्कही आकारले जाते.
- यापूर्वी रेल्वेच्या गट-डी पदांसाठी एकच परीक्षा घेतली जात होती, मात्र यावेळी ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जात आहे.