मुक्तपीठ टीम
हिवाळ्यात सर्दी, ताप, खोकळा, किंवा पोटदुखी, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवणे सामान्य आहे. या आजारांपासून बरे होण्यासाठी अनेकदा आपण अँटिबायोटिक्सची मदत घेतो. अत्यंत आजारी असतानाच अँटिबायोटिक्स घ्यावीत, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. किरकोळ ताप किंवा सर्दी खोकला झाल्यास अँटीबायोटिक्सचे सेवन करणे भविष्यात हानिकारक ठरू शकते. अधिक अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे भविष्यात पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे आजारातही अँटीबायोटिक औषधे घेणे का टाळावे जाणून घ्या कारण…
अँटीबायोटिक्स का नको?
- कोणतीही अँटीबायोटिक्स औषधे घेतल्यावर पचन समस्या, बद्धकोष्ठता, मळमळ, उलट्या, अतिसार, गोळा येणे, भूक न लागणे किंवा पोटात पेटके येणे असे साईड इफेक्ट्स होऊ शकतात.
- ज्यांना आधीच जुलाब किंवा पोटाशी संबंधित कोणताही आजार आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच अँटीबायोटिक्स खावेत.
अँटीबायोटिक्सने रोगप्रतिकारशक्ती वाढते परंतू आरोग्यावरही खूप नुकसान करते…
- अँटीबायोटिक्समुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
- अँटीबायोटिक्सचा वापर अत्यंत गंभीर असेल तेव्हाच केला पाहिजे.
- छोट्या-छोट्या आजारातही अँटीबायोटिक्सचे सेवन केले तर त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ शकतो.
- क्वचित प्रसंगी, अँटीबायोटिक्सचा वापर गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रियांना कारणीभूत ठरू शकतो.
- याला अॅनाफिलेक्सिस म्हणतात.
- अॅनाफिलेक्सिसच्या लक्षणांमध्ये अत्यंत अस्वस्थता, मुंग्या येणे आणि चक्कर येणे किंवा चेहरा, तोंड आणि घशाला सूज येणे अशी लक्षणे दिसतात.