Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनसेच्या ‘राज’सभेसाठी संभाजीनगरच का? कारण आहे ३४ वर्ष जुनं!!

May 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray (5)

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमधील जाहीर सभा चर्चेचा विषय ठरली आहे. मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्याबरोबरचं या सभेचे ठिकाणही चर्चेचा विषय बनला आहे.मुंबई-पुणे-ठाणे यानंतर औरंगाबादच का, याचं उत्तर मिळवण्यासाठी ३४ वर्षे मागे जावं लागेल. मनसेच्या निवडीत शिवसेनेच्या हिंदुत्ववादी प्रवासाची झलक दिसते. ओरंगाबादच्या ज्या मैदानात राज ठाकरेंची सभा होत आहे, तिथंच १९८८मध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरें यांची सभा झाली होती. त्याच मैदानावरून बाळासाहेबांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा, ही पहिली घोषणा केली होती.

खान की बाण…शिवसेनेच्या मनाला हात घालणारा प्रश्न याच मैदानातून!

  • औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं, अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच पुढे आणली होती.
  • १९८८ मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या एका सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी ही मागणी केली होती.
  • औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत पूर्वी ‘खान हवा की बाण हवा’, हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य असायचं.
  • याच राजकारणावर त्यांनी वर्षानुवर्षे औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात स्थान निर्माण केलं.
  • मराठवाडा मुंबई-ठाण्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला ठरला.
  • त्याचमुळे शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी मनसेनं हेच मैदान निवडलं.
  • आता याच मैदानावर राज ठाकरे आज सभा घेणार आहेत.
  • ही सभा जाहीर करताना औरंगाबादचा उल्लेख त्यांनी ‘संभाजीनगर’ असा केला होता.
  • यामुळे, राज ठाकरे आपल्या सभेत मशिदींच्या भोंग्यांसोबतच ‘संभाजीनगर’ नामांतराचा मुद्दा उपस्थित करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज १ मे रोजी औरंगाबादेत सभा होणार आहे. मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण तापवलं आहे. तसेच त्यांनी भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेमुळे मनसे विरुद्ध शिवसेना संघर्ष दिसत आहे. हिंदुत्वावरून मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून मनसेला उत्तर दिले आहे. खरे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबच, अशा आशयाचे बॅनर शिवसेनेनं लावले आहेत.


Tags: Balasaheb thackerayMaharashtra DaymnsRaje ThackeraySambhajinagarऔरंगाबादबाळासाबेह ठाकरेमनसेराज ठाकरेसंभाजीनगर
Previous Post

चंद्रमुखी: सारं काही देखणं तरी…पण एकदा तरी नक्कीच पाहा!

Next Post

राजकारणाचा महाराष्ट्र दिवस : चार पक्ष, चार दिशा! औरंगाबाद, मुंबई आणि महाराष्ट्र दणाणणार!

Next Post
Cm, raj Thackeray, Devendra fadnavis And prakash ambedkar

राजकारणाचा महाराष्ट्र दिवस : चार पक्ष, चार दिशा! औरंगाबाद, मुंबई आणि महाराष्ट्र दणाणणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!