मुक्तपीठ टीम
कोठडीतील नेत्यांच्या आरोग्य तपासणीचे चोचले, जनसामान्यांसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्याकडे मात्र दुर्लक्ष! उपोषण करणाऱ्या नेत्यांच्या तपासणीसाठी राज्य शासनाने डॉक्टर पाठविणे गरजेचे मानले जाते. असे असताना २४ तासांनंतरही युवराज संभाजीराजेंची शासकीय वैद्यकीय तपासणीसाठी एकही डॉक्टर सरकारने पाठविलेला नाही. सरकारच्या या असंवेदनशीलतेचा मराठा आंदोलक आणि समाजातून निषेध करण्यात आला आहे.