मुक्तपीठ टीम
मागच्या एका वर्षापासून कोणालाच बँक खात्यात घरगुती एलपीजी सबसिडी मिळाली नाही. याचे कारण हे आहे की सरकारने घरगुती गॅसवर सबसिडी देणे बंद केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे २०२० च्या मे महिन्यापर्यंत अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजीच्या किंमतींमध्ये कोणताही फरक नाही, त्यामुळे कोणत्याही ग्राहकाला अनुदानाची रक्कम हस्तांतरित केली जात नाही.
तेल आणि गॅस क्षेत्रासाठी असणाऱ्या अधिकृत सोशल मीडिया आधारित तक्रार निवारण प्लॅटफॉर्म @MoPNG e-Seva या ट्विटर हँडलवर, एका वापरकर्त्याने विचारले, ‘१ वर्षाहून अधिक काळ झाला आहे पण आम्हाला एलपीजी गॅस सिलेंडरचे अनुदान मिळाले नाही. ऑनलाइन पोर्टलवर तक्रार केली पण त्यावर काहीच उत्तर मिळाले नाही! ‘
पिछले 1 साल से अधिक समय हो गया हैं लेकिन हमे एलपीजी गैस सिलिंडर की सब्सिडी नहीं मिली हैं मैने ऑनलाइन पोर्टल पे कम्प्लेन की लेकिन कोई जवाब नहीं मिला ही ! @MoPNG_eSeva @IndianOilcl
— Urvish Nandola (@Urvishnandola) August 29, 2021
या प्रश्नाला या प्लॅटफॉर्म कडून हे उत्तर मिळाले, ‘प्रिय ग्राहक, मे २०२० पासून अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजीच्या किंमतींमध्ये कोणताही फरक नसल्याने कोणत्याही ग्राहकाला अनुदानाची कोणतीही रक्कम हस्तांतरित केली जात नाही.’
प्रिय ग्राहक, चूंकि 2020 मई से सब्सिडी वाले और गैर-सब्सिडी वाले एलपीजी की कीमतों में कोई अंतर नहीं है, इसलिए किसी भी ग्राहक को सब्सिडी की कोई राशि हस्तांतरित नहीं की जाती है।
— MoPNG e-Seva (@MoPNG_eSeva) September 2, 2021
१ मार्च २०१४ रोजी अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ४१०.५० रुपये होती, तर विनाअनुदानित सिलिंडरची किंमत १०८०.५ रुपये होती. त्याचवेळी, दिल्लीमध्ये १४.२ किलो विनाअनुदानित सिलिंडर एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून ८८४.५० रुपये झाली आहे.
एप्रिल-जुलैमध्ये वित्तीय तोटा नऊ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. पेट्रोलियम सबसिडी बाबत बोलायचे झाले तर, खर्च बजेट रकमेच्या फक्त ९% होता. हे अनुदान फक्त एलपीजीसाठी आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत १ मे २०२० रोजी ५८१.५० रुपयांवरून १ सप्टेंबर रोजी ८८४.५० रुपये झाली, परंतु सबसिडी खाली आली.