मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांचीतल वाद हा काही नवा नाही. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीवरुन पुन्हा एकदा सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष बघायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांनी पत्र लिहित पत्रातील भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या नेमक्या कोणत्या पत्रावरुन नाराज झाले आहेत हे पाहुयात…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पत्र जसं आहे तसे
विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
कायदे मंडळाने काय कायदे केले ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्रातून उत्तर दिलं होतं. ‘विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. राज्यपाल महोदयांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये, कायदेशीर आहे की नाही? हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये, आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही.