मुक्तपीठ टीम
दैनिक भास्करचे राष्ट्रीय संपादक लक्ष्मी पंत यांचं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. यावेळी त्यांनी जो मुद्दा मांडला आहे तो खरंच विचार करण्यास लावणारा आहे. खरंतर आपल्यातीलही अनेकांनी कधी ना कधी हा विचार केला असेलच! त्यांनी प्रश्न विचारला आहे की, कार्यालयात सरकारी अधिकारी, मंत्री, नेते त्यांच्या खुर्च्यांवर सफेद टॉवेल का ठेवतात? या टॉवेल ठेवण्यामागील नेमकं समाजशास्त्र काय आहे? त्यांचं ट्वीट आणि त्यावरील प्रतिक्रियांचा आढावा मनोरंजकही आहे.
काय आहे ट्वीट?
आज तक समझ से परे है कि अफसर दफ़्तरों में अपनी कुर्सियों पर तौलिया क्यों लगाते हैं….? कोई मित्र बताएगा कि इस तौलिया का समाजशास्त्र क्या है..? pic.twitter.com/CWQ7RPY3gT
— LP Pant (@pantlp) December 13, 2022
त्यांच्या या ट्वीटला अनेक लोकांनी उत्तरं दिली आहेत. काय आहेत ते पाहूया…
बुलंद आवाज
क्योंकि कुर्सी से ज़्यादा चिपके ना ..
सरकारी कुर्सी पराई है .. आज है , कल नहीं ! न जाने कब ट्रांसफ़र ऑर्डर आ जाये
मगर तौलिया अपना है.. जहां जाएँगे साथ जाएगा 😀 https://t.co/rJ430WSfj3
— Buland Awaaz (@buland_awaaz) December 13, 2022
- कारण खुर्चीला जास्त चिकटून राहू नये.
- सरकारी खुर्ची अनोळखी.. आज आहे उद्या नाही! बदलीची ऑर्डर कधी येईल माहीत नाही पण टॉवेल आमचा आहे.. आम्ही जिथे जाऊ तिथे सोबत जाईल.
रुशी खाखर
-त्यात इतकं ज्ञान टाकायची गरज नाही.
-हे खूप सोपे आहे.
-जर खुर्ची राळ किंवा लवचिक सामग्रीची बनलेली असेल तर घाम येऊ नये म्हणून टॉवेल किंवा सुती कापड ठेवतात.
धरम पूनिया
कुर्सी की सीट रेगजीन,रबर या चमड़े की होती नीचे पसीना आ जाता है सिधे इस पर बैठने से तो कपड़े के रूप मै तोलिया लगा लेते हैं लम्बे रूट का बस चालक भी सीट पर तोलिया लगाते है
— Dharam Poonia (@DharamPoonia8) December 13, 2022
- खुर्चीची सीट रेक्झिन, रबर किंवा चामड्याची असते.
- घाम येतो, त्यावर थेट बसू नये म्हणून ते टॉवेल ठेवतात.
- लांबच्या मार्गावरील बसचालकही सीटवर टॉवेल ठेवतात.
- जेव्हा तुम्हाला जास्त वेळ बसाल्याने घाम येतो, तेव्हा टॉवेल घाम शोषून घेतो.
- तेव्हा बराच वेळ बसल्याने घाम येऊ शकतो जो पँटमध्ये परावर्तित होऊ शकतो, टॉवेल तो घाम चांगल्या प्रमाणात शोषून घेतो.
फक्त पांढरा टॉवेल का? लाल, पिवळा, निळा किंवा काळा का नाही?
- टॉवेलचा देखील स्वतःचा दृष्टिकोन असतो.
- आता हा ट्रेंड राजकारणी आणि मंत्र्यांच्या खुर्चीतही दिसत असल्याने अनेक वापरकर्ते याचा संबंध भारतीय सत्तेच्या राजकारणाशीही जोडताना दिसतात.
- खुर्च्यांवर पांढरे टॉवेल ठेवण्याचे कारण काहीही असले तरी इंग्रजांच्या काळापासून सुरु आहे.