मुक्तपीठ टीम
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आले आहे. प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस आणि भाजपाला मागे टाकत एऔ९२ जागांवर विजय मिळविला. दरम्यान आपने आपल्या ट्वीटर अकाउंटवरून इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे एक ट्विट रिट्विट केले आहे. आर्चर हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो.
आर्चर गेल्या आठ महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे, मात्र सोशल मीडियावर त्याची लोकप्रियता भरपूर आहे. यापूर्वी आर्चरचे अनेक जुने ट्विट सध्याच्या काळात जोडून रिट्विट करण्यात आले होते. यावेळी व्हायरल होत असलेले आर्चरचे ट्विट २० फेब्रुवारीचे आहे.
या ट्विटमध्ये आर्चरने लिहिले – स्वीप?! म्हणजे कचरा साफ करणे. कौंटी क्रिकेटमधील सामन्यातील कामगिरीबद्दल त्याने हे ट्वीट केले आहे. याला रिट्विट करत आम आदमी पार्टीने कॅप्शनमध्ये लिहिले – होय, होय! सध्याच्या निवडणुकांशी जोडून आपने हे शेअर केले आहे. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. आपने या निवडणुकीत पंजाबमध्ये इतर सर्व पक्षांचा अगदी कचरा करत त्यांना त्या राज्याच्या राजकारणातूनच साफ करून टाकलं आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला पंजाब विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी ११७ पैकी ५९ जागा जिंकण्याची गरज होती. मात्र, प्रत्यक्षात आपने पंजाबात ९२ जागा जिंकल्या आहेत. मात्र, अंतिम वस्तुस्थिती पूर्णपणे निकालानंतरच स्पष्ट होईल. अभिनेता आणि राजकारणी भगवंत मान यांचे नाव आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं होतं. आता त्यांचा शपथविधी होईल. मान आज केजरीवालांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत.