मुक्तपीठ टीम
पाकिस्तानात नव्या पंतप्रधानांची निवड होण्यापूर्वी रस्त्यांवर घोषणाबाजीचं युद्ध रंगलं. रविवारी रात्री लोहारसह काही शहरांमध्ये इम्रान खान समर्थकांनी लष्कराविरोधात घोषणा दिल्या. लष्कराला चौकीदार संबोधत “चौकीदार चोर है” घोषणा दिल्या गेल्या.
सत्ता गमावल्यानंतर इम्रान समर्थकांचा थयथयाट
- पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवल्याचा निषेध केला.
- पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आले, ज्याची जगभरात चर्चा होत आहे.
- इस्लामाबाद, कराची, पेशावर आणि लाहोरसह विविध शहरांमध्ये निदर्शने झाली.
- यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.
کل رات ایک تاریخ رقم ہوئی ہے – عمران خان کی ایک کال پر نہ صرف پاکستان بلکہ پوری دنیا میں مقیم پاکستانی ایک خودار پاکستان کے حق میں باہر نکلے اور #امپورٹڈ_حکومٹ_نامنظور کے نعروں کی صدائیں گونجتی رہیں- تاریخ گواہ رہے گی کہ آپ وہاں موجود تھے اور آپ نے اس ناانصافی کیخلاف علم بلند کیا pic.twitter.com/LQOQwYqpP6
— Faisal Javed Khan (@FaisalJavedKhan) April 11, 2022
‘चौकीदार चोर है’च्या घोषणा!
- पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातही निदर्शने पाहायला मिळाली.
- इथल्या निदर्शनाची खास गोष्ट म्हणजे लोक रस्त्यावर इम्रान खानच्या समर्थनार्थ ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा देत होते.
- पंजाबच्या लाल हवेलीमध्ये हजारो लोकं जमली होती.
- आंदोलनादरम्यान, जमावाने सैन्याला चौकीदार म्हणून चित्रित केले आणि त्यांना चोर म्हटले, ज्यांनी इम्रान खानच्या जनादेशाच्या चोरीमध्ये भूमिका बजावली आहे.
लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना हटवण्याचा प्रयत्न
- इम्रान खान यांनी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना पंतप्रधानपदावरून हटवण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा पाकिस्तानी माध्यमांमध्ये करण्यात आला होता.
- पाकिस्तानातील राजकीय संघर्षात इम्रान खान यांचा प्रयत्न लष्कर प्रमुख बाजवांच्या जागी अशा अधिकाऱ्याला आणण्याचा होता, जो परदेशी कटाच्या आरोपाच्या त्यांच्या दाव्याचं समर्थन करेल आणि सत्तेत राहण्यासाठी मदत करेल. पण तसे झाले नाही.
- त्यामुळे इम्रान समर्थकांमध्ये लष्कराविषयी राग आहे.
- इम्रान यांनी यासाठी नवनियुक्त अधिकाऱ्याचीही नियुक्ती केली होती, मात्र संरक्षण मंत्रालयाने नव्या नियुक्तीसाठी आवश्यक अधिसूचना जारी केली नाही.