मुक्तपीठ टीम
काहीदिवसांपुर्वी तवांगमध्ये भारतीय सैनिकांची चीनसोबत चकमक झाली, त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पहिल्यांदा अरुणाचल प्रदेशला भेट दिली आहे. संरक्षण मंत्रींनी एलएसीला लागून असलेल्या सियांग भागात बीआरओच्या महत्त्वाच्या पुलाचे उद्घाटन केले. अरुणाचल प्रदेशच्या एकूण चार सीमा पुलांचे उद्घाटन केले आहे, जे भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनवर विश्वास ठेवला तर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे स्वतः सियोम ब्रिजच्या उद्घाटन समारंभात स्यांगमध्ये होते. संरक्षण मंत्री आज देशभरातील एकूण २२ सीमा पुलांचे ई-उद्घाटन करणार आहेत. भारतातील ‘त्या’ पुलांमुळे चीनला का येतो संताप? चला जाणून घेऊया सियोम ब्रिज का महत्त्वाचा आहे…
सियोम ब्रिज भारतासाठी खास का?
- सियोम नदीवर बांधलेला हा पूल भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.
- याचा वापर करून भारतीय लष्कर आपले सैनिक LAC वर सहजपणे तैनात करू शकतील.
- हा पुल १०० मीटर लांब आहे.
- सिओम ब्रिजचं नाव येत तेव्हा चीनची चिडचिड होते.
- बीआरओने अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या पाच वर्षांत ३.९७ किमीचा रस्ता तयार केला आहे.
LAC वर सीमा पायाभूत सुविधा मजबूत…
- पूर्व लडाख आणि आता अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची पीएलए आर्मी आणि भारतीय लष्कर यांच्यात तणाव आहे.
- बीआरओ LAC वर सीमेवरील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
- या पुलमुळे लष्कराच्या हालचालीतील वेळ आणि अडचण कमी करता येईल.
- सीमेवर राहणाऱ्या स्थानिकांनाही पूल आणि रस्त्यांचा लाभ मिळत असल्याने त्यांचे जीवन सुसह्य होत आहे.
- बीआरओच्या मते, गेल्या वर्षी २०२२ मध्ये चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर एकूण १०३ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
- यामध्ये ६७ पूल, ३० रस्ते, ०२ हेलिपॅड, ०१ कार्बन हाऊसिंग बांधण्यात आले आहेत.