Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पंडित नेहरूंच्या जन्मदिनी बाल दिवस का? “आजची मुलं उद्याचं भविष्य!”

November 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
jawaharlal nehru

मुक्तपीठ टीम

आज संपूर्ण देशात बालदिवस साजरा केला जात आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळा-महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. पण पंडित नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिवस का साजरा केला जातो? यामगाचा इतिहास आज जाणून घेऊया…

बालदिवसाचा इतिहास!!

  • पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला.
  • पंडित नेहरू यांचे लहान मुलांवर अपार प्रेम होते.
  • पंडित नेहरू नेहमी लहान मुलांमध्ये रमायचे, त्यामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे, आणि म्हणूनच त्यांना चाचा नेहरू म्हणूनही ओळखले जाते.
  • पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या एका प्रसिद्ध भाषणात म्हणाले होते, “आजची मुलं उद्याचा भारत घडवतील. आम्ही त्यांना जसे घडवू ते देशाचे भविष्य घडेल.
  • नेहरू यांचे १९६४ साली निधन झाले आणि त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यानां श्रद्धांजली म्हणून त्यांचा जन्मदिवस बालदिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव संसदेने मंजूर केला.
  • त्यांना गुलाब या फुलाचीही आवड होती.
  • म्हणूनच त्याच्या कोर्टच्या खिशात नेहमी गुलाब असायचा.
  • १९६४ पूर्वी भारतात २० नोव्हेंबरला बालदिवस साजरा केला जात होता.

जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

  • पंडित जवाहरलाल नेहरू काश्मीरमधील पंडित घराण्यातील होते. त्यांना विजय लक्ष्मी पंडित (मोठी बहीण) आणि कृष्णा हुथीसिंग (लहान बहीण) नावाच्या दोन बहिणी होत्या.
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांना कधीही नोबेल पारितोषिक मिळाले नाही, जरी त्यांना १९५० ते १९५५ या काळात ११ वेळा नामांकन मिळाले. जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या शांततेच्या कार्यासाठी मोठ्या प्रमाणात नामांकन देण्यात आले होते.
  • १९०७ मध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये लॉ ला प्रवेश घेतला. नेहरूंनी १९१० मध्ये , केंब्रिज विश्वविद्यालयातून न्याय शास्त्रातील शिक्षण पुर्ण केले.
  • ऑगस्ट १९१२ मध्ये ते भारतात परतले आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात वकीली सुरु केली.
  • देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात पंडित जवाहरलाल नेहरूंना वेगवेगळ्या नऊ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. एकूण, ब्रिटिशांनी नेहरूंना ३२५९ दिवस कैद केले होते.
  • तुरुंगात असताना त्यांनी १९३५ मध्ये आत्मचरित्रही लिहिले. १९३६ मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये प्रदर्शित झालेल्या “Toward Freedom” असे त्याचे नाव होते.
  • नेहरू १९२९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांची मोठी भूमिका होती.
  • सन १९२७ मध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रस्ताव देणारे ते पहिले होते आणि त्यांनी भारतीय नागरी सेवा (ICS) सह ब्रिटीश साम्राज्याशी भारतीयांना बंधनकारक असलेल्या सर्व संबंधांचा त्याग केला.
  • नेहरू १९१६ मध्ये ऍनी बेझंटच्या होम रुल लीगमध्ये कार्यकर्ते होते.
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांना “आधुनिक भारताचे शिल्पकार” म्हणूनही ओळखले जाते.
  • १९४७ साली जेव्हा भारत स्वतंत्र्य झाला, तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरुंना भारताचे पहिले पंतप्रधान बनवण्यात आले. त्यानंतर तीन वेळा सलग नेहरू हे पंतप्रधान पदावर विराजमान राहिले.
  • पंडित नेहरू २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.

Tags: childrens dayFormer Prime Minister Pandit Jawaharlal NehruIndiaबालदिवसभारतमाजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
Previous Post

डीएलआरएलमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस आणि टेक्निशियन पदांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

जितेंद्र आव्हाडांवर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई! – महेश तपासे

Next Post
mahesh Tapase on Jitendra Awhad

जितेंद्र आव्हाडांवर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई! - महेश तपासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!