Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तावडे आणि मुंडेंपेक्षा भाजपाने का निवडले बोंडे? जाणून घ्या कारणं…

June 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
vinod tawde Anil Bonde pankaja Munde

मुक्तपीठ टीम

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्याचं राजकारण चागलंच तापलं आहे. राज्यातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान भाजपाकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल,अमरावतीचे भाजपा नेते अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत सर्वाधिक चर्चा होतेय ती अमरावतीचे भाजपा नेते अनिल बोंडे यांच्या नावाची. अनिल बोंडे यांच्या जागी पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर आदी नेत्यांच्या नावांचा समावेश होता. मात्र विदर्भातील आक्रमक चेहरा म्हणून समोर आलेल्या डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपाने अनपेक्षित धक्का दिला आहे. अनिल बोंडे यांना भाजपाने तिकीट का दिले? चला जाणून घेऊया ही पाच मोठी कारणे…

ओबीसी चेहरा

अनिल बोंडे हे महाराष्ट्रातील भाजपाचा मोठा ओबीसी चेहरा आहेत. राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपा ओबीसी व्होट बँकेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ओबीसी समाजाला चांगल्या संधी मिळू शकतील, अशी भाजपाला आशा आहे. बोंडे यांना तिकीट देऊन विशेषत: ओबीसी समाजात वेगळे स्थान निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. याआधीही विदर्भात झालेल्या अनेक जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आरक्षण नसतानाही भाजपाने सावधपणे संपूर्ण समाजाला प्रतिनिधित्व दिले होते. या निर्णयाचा आगामी निवडणुकीत काही फायदा होईल, अशी आशा भाजपाला आहे.

अमरावती दंगलीत घेतलेली भूमिका

२०२१ मध्ये अमरावतीच्या दंगलीत अनिल बोंडे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिकाही त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळण्यामागे मोठे कारण असल्याचे बोलले जात आहे. त्रिपुरातील कथित हिंसाचारानंतर महाराष्ट्रातील अमरावती येथे मोर्चा काढण्यात आला. ज्यामध्ये हिंसाचार झाला. त्याविरोधात भाजपाकडून बंदची हाक देण्यात आली होती. यादरम्यान भाजपा आणि आरएसएसवर हिंसाचाराचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली. त्याच्यासह अनेकांना अटक करण्यात आली. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोंडे यांच्यावर जोरदार आरोप केले. बोंडे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

गडकरी आणि फडणवीस यांच्याशी चांगले संबंध

अनिल बोंडे यांनी १९९८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २००९ मध्ये त्यांना शिवसेनेने तिकीट दिले नाही, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला आणि स्वत:चा संग्राम पक्ष स्थापन केला आणि निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवाराचा पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचे गडकरींशी चांगले संबंध होते. त्यानंतर त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे संबंधही चांगले झाले. २०१४ मध्ये त्यांनी मोर्शीतून निवडणूक जिंकली. २०१९ च्या अखेरीस अनिल बोंडे यांना चार महिन्यांसाठी कृषिमंत्रीही करण्यात आले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा देवेंद्र भुयार यांच्याकडून पराभव झाला होता. असे असतानाही ते पक्षात सक्रिय राहिले. याचा त्यांना फायदाही झाला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा आवाज

अनिल बोंडे हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना शेतकरी, शेती आणि त्याच्याशी संबंधित समस्यांची चांगली जाण आहे. शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक चेहरा लक्षात घेऊन भाजपाने त्यांना ही संधी दिली आहे. २०१९ मध्ये भाजपाने अनिल बोंडे यांना राष्ट्रीय किसान मोर्चाचे सचिव केले. गुजरात आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रभारीपदाची जबाबदारीही देण्यात आली होती.

अमरावतीत भाजपाचा मोठा चेहरा

महाराष्ट्राच्या अमरावती शहराच्या राजकारणात सध्या काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थक खासदार नवनीत राणा, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे. अशा स्थितीत विदर्भ हे मोठे शहर असल्याने अनिल बोंडे यांच्या माध्यमातून भाजपा स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सध्या राणा दाम्पत्य भाजपा समर्थक भूमिकेत आहे. त्याचवेळी भाजपाने बोंडे यांना राज्यसभेवर पाठवून नवनीत राणा यांचा मार्ग मोकळा केला आहे.


Tags: Anil bondeBJP Maharashtrapankaja mundevinod tawdeअनिल बोंडेपियुष गोयलभाजपाराज्यसभा निवडणुक
Previous Post

कोरोनाचा राजकीय पक्षांनाही फटका, भाजपा-काँग्रेसच्या देणग्या निम्म्या!

Next Post

सोनिया आणि राहुल गांधी यांच्यामागे ईडी लावणारे ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Next Post
Sonia Gandhi And rahul Gandhi

सोनिया आणि राहुल गांधी यांच्यामागे ईडी लावणारे ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!