मुक्तपीठ टीम
आयपीएलच्या मागील हंगामात अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स या संघाकडून दिल्लीच्या पराभव झाला. पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि शिखर धवन, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन अशा काही खेळाडूंनी आपल्या खेळीच्या जोरावर दिल्ली संघाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. सुरुवातीस संघात स्थान न मिळालेल्या अंजिक्य राहाणेनेही चांगली खेळी करत पून्हा संघात आपले स्थान बनवले होते. दिल्लीतील काही खेळाडूंना करारमुक्त करण्यात आले आहे. तर काहीना कायम संघात राखण्यात आले आहे. लिलावादरम्यान काही खेळाडूंना विकत घेण्यात आले आहे. असे असले तरी दिल्लीच्या एका खेळाडूच्या वक्तव्यामुळे संपूर्ण संघ टेन्शनमध्ये आला आहे.
𝚂𝚃𝙰𝚃𝚄𝚂: 𝙇𝙤𝙖𝙙𝙞𝙣𝙜 100%
🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩#WeRoarTogether 💙#YehHaiNayiDilli #IPLAuction #IPL2021 pic.twitter.com/Jx6ECwanye— Delhi Capitals (@DelhiCapitals) February 18, 2021
दिल्ली संघाने कायम राखलेल्या खेळाडूंमध्ये दक्षिण ऑफिकेच्या जलद गोलंदाज कगिसो रबाडा याचा समावेश आहे. मात्र, एका मुलाखतीत “देशाचा विचार आयपीएलपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. जर पाकिस्तान दौरा आयपीलच्या वेळापत्रकावेळीच असेल तर अशा वेळी मी देशाला प्राधान्य देईन. तसे झाल्यास कदाचित आयपीएलचा पहिला आठवडा मी दिल्ली संघात नसेन. मी नंतर संघात दाखल होईन”, असे रबाडाने मुलाखतीत सांगितले.
दिल्लीने लिलावात विकत घेतलेले खेळाडू
- स्टीव्ह स्मिथ,
- सॅम बिलिंग्ज
- टॉम करन
- रिपल पटेल
- विष्णू विनोद
- उमेश यादव
- लुकमन मेरिवाल
- एम. सिद्धार्थ
संघात कायम असलेले खेळाडू
- श्रेयस अय्यर
- शिखर धवन
- पृथ्वी शॉ
- अजिंक्य रहाणे
- ऋषभ पंत
- अक्षर पटेल
- अमित मिश्रा
- इशांत शर्मा
- रविचंद्रन अश्विन
- ललित यादव
- हर्षल पटेल
- आवेश खान
- प्रवीण दुबे
- कागिसो रबाडा
- एनरिच नॉर्खिया
- मार्कस स्टॉयनिस
- शिमरॉन हेटमायर
- ख्रिस वोक्स
- डॅनियल सॅम्स