सुश्रुषा जाधव / मुक्तपीठ टीम
मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. त्या सोहळ्यात शिवसेना नेत्यांची भाषणे झालीच. पण सर्वांच्या लक्षात राहिला तो युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वागण्यातून दिसलेली मराठी संस्कारांची प्रचिती. शिवसेना नेते सुभाष देसाई हे भाषणासाठी माईकसमोर गेले. ते आदित्य ठाकरेंच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना थांबवले. त्यांच्याआधी भाषण केले. आपल्या भाषणातही त्यांनी त्याचा खास उल्लेख केला. ते म्हणाले, “देसाईसाहेबांकडून मी माईक घेतला कारण ते सर्वच बाबतीत ज्येष्ठ आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे मी त्यांच्यानंतर बोलले पाहिजे. त्यानंतर मी त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच असतात.” एक प्रकारे शिवसेनेच्या या युवा नेतृत्वाने आपल्या वागण्यातून ज्येष्ठांना मान देण्याचे मराठी संस्कारच दाखवले, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली आणि अर्थातच त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली.
दहा छायाचित्रांमधून समजून घ्या मराठी भाषादिनी दिसलेले मराठी संस्कार!
छायाचित्र -१
आदित्य ठाकरे गजानन कीर्तिकर आणि अन्य मान्यवरांशी बोलत असताना सुभाष देसाई भाषणासाठी माईककडे निघाले.
छायाचित्र -२
शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई भाषणासाठी उभे राहिले
छायाचित्र -३
शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या लक्षात येताच त्यांनी हात करून अडवलं.
छायाचित्र -४
सुभाष देसाईंनी हात करून त्यांना काही हरकत नसल्याचं सुचवलं असावं.
छायाचित्र -५
आदित्य ठाकरे सुभाष देसाई उभ्या असलेल्या माईककडे निघाले, शिवसेना नेते गजानन कीर्तिक कौतुकमिश्रित आश्चर्यानं पाहत राहिले.
छायाचित्र -६
सुभाष देसाईंनी त्यांना हात दाखवत रोखण्याचा प्रयत्नही केला असावा…
छायाचित्र -७
मात्र, त्यांचं न ऐकता आदित्य ठाकरे माईककडे गेले. त्याआधी सुभाष देसाई तेथून आपल्या खुर्चीकडे गेले. त्यानंतर आदित्य ठाकरे भाषणासाठी उभे राहिले.
छायाचित्र -८
आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीलाच त्यांनी सुभाष देसाई यांच्याकडून माईक का घेतला ते सांगितलं.
छायाचित्र -९
तेवढ्यावरच आदित्य ठाकरे थांबले नाहीत. ते म्हणाले, “शिवसेनेच्या मंचावर आज मी देसाईसाहेब आणि कीर्तिकरसाहेब यांच्यामध्ये बसलेलो. दोन पंख आणि मध्ये मी विमानासारखा. काही चुकलं तरी ते सांभाळून घेतील. सांगतील.”
त्यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली. त्यांच्या मराठी भाषा, संस्कृतीसाठीच्या समर्पणाचा उल्लेख केला.
छायाचित्र -१०
शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाकडून ज्येष्ठत्वाचा उल्लेख करत आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त करताच सुभाष देसाईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
लाल किल्ल्यावर आपलीच सत्ता…
हे सारं सांगत असतानाच आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपलाच आवाज घुमेल. २०२४नंतर दिल्लीत आपलीच सत्ता असेल, असा निर्धार व्यक्त केला.
रावतेसाहेब मराठीसाठी आग्रही असतात, देसाईसाहेबांची शासकीय मराठी अडचण करते!
मराठीविषयी बोलताना शिवसेना नेते दिवाकर रावते वरिष्ठ सभागृहात मराठीसाठी कसे आग्रही असतात, ते सांगितले. एकदा सभागृहात एका आमदाराने कॅबिनेट म्हणताच रावतेसाहेबांनी त्यांना अडवत मंत्रिमंडळ शब्द वापरण्यास सांगितले. त्या आमदारानेही लगेच दुरुस्ती केली. पण सुभाष देसाईंना उद्देशून ते म्हणाले, “देसाईसाहेब आमची अडचण करतात. त्यांची शासकीय मराठी अडचण करते. आपली मराठी सोपी आहे. देसाईसाहेबांनी अनिवार्य केलेली शासकीय मराठी भाषा अडचण करते. जीआर वाचायला घेतले तर अडचण होते.”
पाहा व्हिडीओ: