मुक्तपीठ टीम
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेले असताना काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुणीही नाही. त्यामुळे आता काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड येत्या २० सप्टेंबरपर्यंत होणार असल्याचं कळतं. पुन्हा एकदा राहुल गांधी हेच पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतील यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारण्यास नकार दिल्याने काँग्रेसचे अध्यक्षपद प्रियकां गांधींकडे जाणार की गांधी घराण्याबाहेरील एखादी व्यक्ती काँग्रेसचा नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यातही गांधी घराण्याबाहेरचा गांधीतरच नेता अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
कोण होणार काँग्रेस अध्यक्ष?
- सध्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्ष आहेत.
- मात्र त्या प्रकृतीच्या कारणांमुळे काँग्रेसचे काळजीवाहू अध्यक्षपद सोडण्याच्या तयारीत आहेत.
- त्या लवकरच आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात.
- त्यानंतर २० सप्टेंबरपर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होऊ शकते.
- राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारण्यास नकार दिल्याने १३७ वर्षे जुन्या पक्षाचे बहुतांश सदस्य या पदासाठी प्रियंका गांधी वाड्रा यांच्याकडे पाहत आहेत.
- त्यामुळे सर्व परिस्थिती पहाता प्रियंका गांधी याच काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे.
- पण एकंदरीत राहुल गांधींचं मत लक्षात घेता गांधी घराण्याबाहेरील नेताही अध्यक्षपदी येण्याची शक्यता आहे.
अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा
- नजिकच्या भुतकाळात सीताराम केसरी हे १९९८ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते ते गांधीतर नेते होते.
- काँग्रेसच्या काही नेत्यांकडून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे अशी मागणी होत आहे.
- काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाचीही चर्चा आहे.
- अशा स्थितीत काँग्रेस पक्षात नव्या अध्यक्षाची जबाबदारी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.