रोहिणी ठोंबरे
बालपणी अनेक मनोरंजक कार्यक्रम पाहायला मिळाले. ते लोकप्रिय ही झाले. असाच एक कार्यक्रम म्हणजे चाचा चौधरी. चाचा चौधरी हे एक अतिशय लोकप्रिय भारतीय कॉमिक्स पुस्तकातील पात्र आहे. जे दिवंगत व्यंगचित्रकार प्राणकुमार शर्मा यांनी तयार केले होते. हे कॉमिक्स हिंदी आणि इंग्रजीसह इतर दहा भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झाले आहेत. हे भारताचे सर्वाधिक विकले जाणारे कॉमिक्स पुस्तक आहे. त्यामुळेच नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर! उगवत्या पिढीत नद्यांविषयी जागृती करण्यासाठी नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर म्हणून चाचा चौधरींची निवडही करण्यात आली. त्यामुळेच मुक्तपीठच्या प्रतिभा आणि प्रतिमा कॅटेगरीत या अजरामर कार्टून कॅरेक्टरला खास स्थान देण्यात आले आहे.
चाचा चौधरींचे जनक कार्टूनिस्ट प्राण!
यामध्ये चाचा चौधरीच्या व्यक्तिरेखेप्रमाणे प्राण साहेब १९७० आणि १९८० च्या भारतीय कुटुंबातील इतर पात्रांचे चित्रण करतात. यातील बरेचसे खलनायक यंत्रणेचे लोक, चोर, रस्त्यालगतचे गुंड आणि बदमाश, फसवे लोक असतात. ते केवळ त्यांच्याशी लढत नाही तर सामान्य माणसालाही मदत करतात आणि ते त्यांना नैतिक धडे आणि चांगले वर्तन देखील शिकवतात. सामान्य मध्यमवर्गीय लोकांप्रमाणे त्यांनाही रोजच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
चाचा चौधरींविषयीची विशेष माहिती
- “चाचा चौधरी” एक सामान्य मध्यमवर्गीय भारतीय म्हणून चित्रित केला गेला आहे, जरी त्यांची वृद्ध भूमिका असली तरी त्यांची बुद्धिमत्ता तल्लख दाखवली आहे.
- चाचा चौधरींचा पोशाख आणि राहणीमान हे लाल पगडी, लाकडी काठी, दोन्ही बाजूला कप्पे असणारा कोट असा दाखवण्यात आला आहे.
- सुरुवातीच्या काही कॉमिक्समध्ये, त्यांना पारंपारिक धोती-कुर्त्यामध्ये चित्रित करण्यात आले होते, जे नंतर आधुनिक वातावरणाचा संदर्भ देत पॅंट आणि शर्ट परिधान करून दाखवले गेले.
- यामध्ये त्यांना, पत्नी बिनी (चाची), रॉकेट नावाचा एक कुत्रा आणि ज्युपिटर साबू, या पात्रांसह दाखवले आहे.
- चाचा चौधरी अनेकदा टरबूज खाताना दिसतात, पण आंबा हा त्यांना अतिशय आवडतो असे दाखवले आहे.
- जेव्हा जेव्हा घरात त्यांची बायको त्यांच्यावर रागावते, तेव्हा ते साबू किंवा रॉकेटला घेऊन फिरायला जातात.
छोट्या पडद्यावरही गाजले चाचा चौधरी!
दूरदर्शनवरील या मालिकेत “चाचा चौधरी” चे ६०० हून अधिक भाग एका वाहिनीवर दाखवण्यात आले होते. ज्यामध्ये अभिनेता रघुवीर यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. डायमंड कॉमिक्सच्या दाव्यानुसार, १० ते १३ वयोगटातील भारतीय मुलांनी याला सर्वात लोकप्रिय कॉमिक बुक पात्रांपैकी एक म्हणून ओळखले.
सहाय्यक पात्र
- साबू
साबू हा परग्रहावरचा दाखवला आहे. तो चाचांचा एक अतिशय विश्वासू साथीदार आहे. तो बलवान दाखवला आहे. ज्याची उंची १५ फुटांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. तसेच, बहुतेक कॉमिक मालिकांमध्ये त्याच्या अप्रत्याशित आकाराबद्दल नेहमीच विसंगत वाद असतात. - बिनी चाची
चाचा चौधरीची पत्नी बिनी ही शरीराने जाड आहे. ती एक गृहिणी आहे. तिला अनेकदा पोल्का डिझाईनची साडी १९७० च्या दशकातील हिंदी चित्रपट अभिनेत्रींसारखी केशरचनेत दाखवले जाते. त्याच वेळी, कॉमिक्समध्ये काकू बिनीच्या इतिहासाचा उल्लेख आहे, ती तिच्या काळात कशी जगली. खरं तर, ती एकेकाळी एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होती तिने चाचा चौधरीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. - छज्जू चौधरी
चाचा चौधरींच्या जुळ्या भावाचे नाव छज्जू चौधरी आहे. या पात्राबाबत क्वचितच काही लोकांना माहित आहे. - रॉकेट
रॉकेट हा त्याचा पाळीव कुत्रा आहे. जो त्यांना भटक्या कुत्र्यांसारखा सापडतो आणि त्याला ते आश्रय देतात. त्यांची पत्नी यामुळे चिडते. परंतु घरात घुसलेल्या चोरावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर ती त्याला दत्तक घेते. अशा प्रकारे त्याला “रॉकेट” असे नाव देण्यात आले आहे. - टिंगू मास्टर
एक लहान उंचीचा अनाथ आणि बेरोजगार तरुण, जो चाचांना आपला गुरु मानतो. त्याला साबूसारखा कद नाही, पण या उंचीमुळे आणि चाचांनी शिकवलेल्या युक्तींमुळे तो अनेक समस्या सोडवतो.
हेही वाचा:
‘चाचा चौधरी’ नमामि गंगे कार्यक्रमाचे शुभंकर! उगवत्या पिढीत नद्यांविषयी जागृतीचा प्रयत्न