मुक्तपीठ टीम
आयआयटी आणि इतर औद्योगिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना नोकरीसह पार्ट टाइम पीएचडीही करता येणार आहे. आतापर्यंत त्यांना यासाठी परदेशात जावे लागत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत, केंद्रीय विद्यापीठे आणि राज्य विद्यापीठांमधील अशा व्यावसायिकांना आगामी शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून पार्ट टाइम पीएचडीही करण्याची संधी मिळणार आहे.
यासाठी यूजीसी कॉन्सिलने पीएचडीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. १३ जून रोजी झालेल्या परिषदेच्या बैठकीत पीएचडी २०२२ च्या मसुद्यासाठी यूजीसी नियमन किमान मानक आणि प्रक्रिया मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये आयआयटी आणि औद्योगिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या कंपनी किंवा संस्थेकडून एनओसी घ्यावी लागेल.
यूजीसीचे अध्यक्ष प्रो. एम जगदीश कुमार यांनी सांगितले की, “आता काम करणाऱ्या व्यावसायिकांना नोकरीसह पार्ट टाइम पीएचडी करता येईल. पुढील सत्रापासून, CSIR, ICMR, ICAR इत्यादी विद्यापीठांमध्ये पीएचडीचे प्रवेश समान नियमांनुसार केले जातील. उच्च शैक्षणिक संस्थांना पीएचडीच्या जागांचा तपशील वेबसाइटवर अपलोड करणे बंधनकारक असेल.”
पीएचडी प्रवेशासाठी ७० गुण लेखी, तर ३० गुण मुलाखतीसाठी आवश्यक
- पीएचडी प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांना ७० गुण लेखी, तर ३० गुण मुलाखतीसाठी आवश्यक आहेत.
- किमान १२ क्रेडिट्स आणि कमाल १६ क्रेडिट्स असणे आवश्यक आहे.
- उमेदवार त्यांच्या थीसिसचे पेटंट मिळवू शकतात आणि पीएचडी संशोधनाचे निष्कर्ष दर्जेदार जर्नलमध्ये म्हणजेच पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित करू शकतात.
- पीएचडी व्हिवा ऑनलाइन असेल.
‘हे’ शिक्षक मार्गदर्शक बनू शकतील
- पूर्णवेळ नियमित प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पीएचडी करू शकतील.
- पीएचडी मिळविण्यासाठी प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांकडे किमान पाच प्रकाशित शोधनिबंध असणे आवश्यक आहे.
- तर सहाय्यक प्राध्यापकांसाठी पाच वर्षांचा अध्यापन, संशोधन अनुभवासह तीन संशोधन प्रकाशित असणे आवश्यक आहे.
- नवीन नियमांनुसार, एका प्राध्यापकाला आठपेक्षा जास्त, सहयोगी प्राध्यापक किमान सहा आणि सहाय्यक प्राध्यापक किमान चार पीएचडी स्कॉलर असू शकतात.
- याशिवाय परदेशी पीएचडी स्कॉलर मिळविण्यासाठी दोन विद्वानांना सुपर न्यूमेरिक सीटखाली ठेवता येईल. ६. पीएचडी सहा वर्षांत पूर्ण करावी लागते. कोणतीही संस्था दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी अतिरिक्त वेळ देऊ शकत नाही.
- महिला उमेदवार आणि अपंग व्यक्तींना सहा वर्षांच्या व्यतिरिक्त दोन वर्षांचा अतिरिक्त वेळ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- महिला उमेदवारांना पीएचडी कालावधीत प्रसूती रजा, बाल संगोपन रजा अंतर्गत २४० दिवसांची रजा मिळू शकते.
पीएचडीसंबंधित काही नियम आणि अटी
- विद्यापीठांमधील सध्याची प्रणाली म्हणजे तीन वर्षे पदवी आणि दोन वर्षांचे पीजी करणारे विद्यार्थीही पीएचडीसाठी प्रवेश घेऊ शकतात. पीएचडीच्या प्रवेशासाठी विद्यापीठांच्या किंवा एनटीएच्या संयुक्त प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी त्यांना पीजी प्रोग्राममध्ये ५० किंवा ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- चार वर्षांचे अंडरग्रॅज्युएट आणि एक वर्षाचे पीजी प्रोग्राम करत असलेले विद्यार्थी देखील पीएच.डी.मध्ये प्रवेश घेऊ शकतात.
- राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत, चार वर्षांच्या पदवी कार्यक्रमांतर्गत संशोधन किंवा सन्मान कार्यक्रमाचे विद्यार्थी थेट पीएचडीमध्ये प्रवेश घेऊ शकतील. परंतु पीएचडीसाठी विद्यापीठाच्या संयुक्त प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी सीजीपीए ७.५ पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- विद्यापीठांमधील एकूण जागांपैकी 60% जागा एनइटी किंवा जेआरएफ पात्र विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील.
- विद्यापीठे त्यांच्या केवळ ४० टक्के जागांवर स्वतःहून किंवा एनटीएच्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेद्वारे प्रवेश देऊ शकतात.
- ६० टक्के जागांसाठी पात्र उमेदवार न मिळाल्यास विद्यापीठाला ४० टक्के खुल्या जागांसह रिक्त जागा एकत्र करता येतील.