मुक्तपीठ टीम
कामामधे काम, मुखी सदा हरिनाम!!
भात लावणीची घाई आणि सोबत संस्कृतीची जपवणूकही. सध्या जिथं भात लावणी सुरु आहे, तिथं विरंगुळ्यासाठी हरिनामाचा जपही होतोय. कान आणि मन प्रसन्न करतोय.
भातशेतीतील लावणीचं काम हे केवळ शेतकऱ्यांना भावतं असं नाही तर इतरांनाही ते करावंसं वाटतं. पावसाच्या पाण्यानं शेतातील मातीचा चिखल झालेला असतो. पण तो शहरातील नकोसा वाटणारा नसतो, तर गावाच्या शिवारातील हवाहवासा असा असतं. त्यात साचलेलं पाणी. त्यात मनमुराद लावणी करण्याच्या कामात एक वेगळीच गंमत असते. अगदी सेलिब्रिटींनाही त्याची भुरळ पडते. नुकतीच अभिनेत्री शहनाझ गिल ही अशाच एका भातशेतीत पोहचली. तिथं तिनं भाताच्या लावणीचा आनंद लुटला.
आता तर कोकणच्या, तसेच मावळच्या काही गावांमधील शेतकरी शहरी माणसांनाही लावणीचा हा आनंद उपभोगण्याची संधी मिळवून देत असतात. हजारो लोक त्यासाठी मुलाबाळांसह खास तिथं पोहचतात. तुम्हीही नक्कीच हा आनंद लुटावा असाच आहे…
सौजन्य @Phanase_Patil