मुक्तपीठ टीम
आपण अनेकदा पाहतो ज्यावेळी, आपल्या कुटुंबात आर्थिक संकट येते त्यावेळी आपले वडिल जमापुंजीतून हे संकट दूर करण्याचा प्रयत्न करतात. ही जमापुंजी म्हणजे त्यांनी केलेली बचत असते. आजच्या काळात प्रत्येक कमवती व्यक्ती ही पुढील आयुष्यासाठी बचतीचा मार्ग अवलंबते. देशात सोने आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आता म्युच्युअल फंडासारख्या वित्तीय संस्थांमध्ये बचत करण्याचा लोकांचा कल वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका युनिटने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फंड व्यवस्थापन उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता २०२१-२२ मध्ये १३५ लाख कोटी रुपयांवरून २०२६-२७ पर्यंत ३१५ लाख कोटी रुपये असा अंदाज आहे. अनेक काळापासून धोरण निर्मात्यांना लोकांनी सोने आणि जमीन, घरे या भौतिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, इक्विटी शेअर्स यासारख्या आर्थिक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करावी असे वाटत आहे.
वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक करण्याचे लोकांचे वाढते आकर्षण
- मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून बॉंड आणि स्टॉक मार्केटमध्ये अतिरिक्त रोखीने वाढ झाली आहे.
- या आर्थिकीकरणामुळे म्हणजेच वित्तीय संस्थांमध्ये सामील होण्याचे आणि आर्थिक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याचे लोकांचे आकर्षण वाढले आहे.
- तसेच आर्थिक बाजारपेठेतील दीर्घकाळ व्यत्यय किंवा तरलता पातळी गुंतवणुकदारांना प्रभावित करू शकते असा इशाराही दिला आहे.
- वित्तीय समावेशन, डिजिटायझेशन, मध्यमवर्गीयांचे वाढते डिस्पोजेबल उत्पन्न आणि या उत्पादनांवर सरकारी प्रोत्साहन यामुळे या क्षेत्राला चालना मिळाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुर्गम भागात या उत्पादनांचा प्रवेश वाढवण्यासाठी आणि आर्थिक जागरूकता वाढवण्यासाठी वितरण आघाडीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, या विभागाचा पुरेसा प्रचार होणे आवश्यक आहे. उद्योगाने आपल्या उत्पादनांसाठी केवळ जनजागृती करू नये तर त्याबद्दल लोकांना शिक्षित केले पाहिजे.”