मुक्तपीठ टीम
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप तीन नवीन प्रायव्हसी फिचर्स आणत आहे. या फिचर्सच्या लाँचनंतर, युजर्स कोण ऑनलाइन पाहू शकेल आणि कोण पाहू शकत नाही हे देखील निवडण्यास सक्षम असतील. तसेच या नव्या फिचरमुळे व्ह्यू वन्स मेसेजचे स्क्रीनशॉट देखील ब्लॉक होतील.
मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या फिचर्सची घोषणा करताना म्हटलं, “आम्ही तुमच्या मेसेजचे संरक्षण करण्यासाठी आणि फेस-टू-फेस कन्वर्सेशन प्रमाणेच खासगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन मार्ग शोधत राहणार आहोत.”
नवीन प्रायव्हसी फिचर्स…
१. साइलेंटली ग्रुप लेफ्ट
- हे फिचर्स युजर्सना कोणालाही सूचित न करता ग्रुपमधून बाहेर पडण्याची परवानगी देईल.
- जेव्हा एखादा ग्रुप सोडू इच्छित असेल तेव्हाच प्रशासकांना सूचित केले जाईल.
- हे फिचर्स या महिन्यात आणले जाईल.
२. ऑनलाइन असताना कंट्रोल करणे
- हे फिचर्स युजर्सना त्यांची ऑनलाइन उपस्थिती खासगी ठेवण्यास अनुमती देईल.
- जेव्हा वापरकर्ता ऑनलाइन असतो तेव्हा त्याला कोण ऑनलाइन पाहू शकतो आणि कोण पाहू शकत नाही हे तो ठरवू शकतो.
- हे फिचर्स देखील या महिन्यात आणले जाईल.
३. व्यू वन्स मेसेजेस स्क्रीनशॉट थांबविण्यास सक्षम
- व्ह्यू वन्स मेसेज फिचर्स युजर्सला कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्डशिवाय फोटो किंवा मीडिया शेअर करण्यास अनुमती देते.
- व्ह्यू वन्स मेसेजचे स्क्रीनशॉट ब्लॉक करून युजर्सना सुरक्षिततेचा आणखी एक लेअर मिळेल.
- या फिचर्सची चाचणी केली जात आहे आणि लवकरच ते आणले जाईल.
व्ह्यू वन्स मोडमध्ये फोटो-व्हिडिओ कसा पाठवायचा?
- व्ह्यू वन्स मेसेज मोडद्वारे पाठवलेला कोणताही फोटो आणि व्हिडिओ एकदा उघडल्यानंतर परत पाहता येणार नाही.
- सर्वप्रथम ज्या व्यक्तीला मेसेज करायचा आहे त्याच्या चॅट विंडोवर जा.
- मेसेज बॉक्सवर टॅप केल्यानंतर, संलग्नक चिन्हावर टॅप करा.
- गॅलरी निवडून पाठवायचा असलेला व्हिडिओ किंवा फोटो निवडा.
- कॅप्शनच्या पुढे एक चिन्ह दिसेल ज्यामध्ये १ टॅप करा.
- नंतर एक पॉप-अप येईल ज्यामध्ये Ok वर टॅप करावे लागेल.
- यानंतर पाठवा आयकॉनवर टॅप करा.
- तुमचा मेसेज पाठवला जाईल.
- रिसीव्हर त्यावर टॅप करताच, तो फोटो किंवा व्हिडिओ दिसेल.
- तो फोटो बंद करताच त्याला मेसेज ऐवजी Opened दिसेल.
ग्रुपमधील कोणीही तुमचा फोन नंबर पाहू शकणार नाही
- या फिचरची माहिती यापूर्वी आली होती.
- हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजवर आहे आणि लवकरच चाचणीनंतर लाँच केले जाईल.
- हा नवीन फीचर आल्यानंतर ग्रुपमधील इतर सदस्यांना तुमचा मोबाइल नंबर पाहता येणार नाही.