मुक्तपीठ टीम
२५ लाख रुपयांचा लकी ड्राॅ लागल्याचा मॅसेज सध्या व्हाट्सॲपवर काही जणांना मिळाला आहे. जर तुम्हालाही हा मॅसेज आला आहे, तर सावधान होण्याची गरज आहे. कारण अशा मॅसेजमधून बँकेचे तपशील मिळवले जात आहेत. म्हणजेच तुमच्या एका क्लिकमुळे बँकेची माहिती लीक होऊन, बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं.
एक व्हॉट्सॲप मॅसेज खूप फॉरवर्ड केला जात आहे. ज्यामध्ये तुम्ही २५ लाखांचे बक्षीस जिंकले आहे, असे लिहिले आहे. तुमचे खूप खूप अभिनंदन, कृपया तुमचा पुरस्कार लवकरच स्वीकारा. या मॅसेजमध्ये लॉटरी क्रमांकही लिहिला आहे. यामध्ये एका व्यक्तीचे नाव आणि व्हॉट्सॲप नंबरही शेअर करण्यात आला आहे. तसेच एक लिंक शेअर केली आहे. असे मॅसेज फसवणुकीच्या उद्देशाने केले जातात. या प्रकरणात, काळजी घेणे आवश्यक आहे.
काय करावे आणि काय करू नये?
- अनेक मोबाईल ॲपसच्या मदतीने कोणत्याही देशाचा व्हर्च्युअल नंबर घेऊन व्हॉट्सॲप चालवले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- त्याचा वापर कोण करतंय हे कळणे अशक्य आहे.
- सायबर ठग मुख्यतः व्हर्च्युअल नंबरवरून सायबर फसवणूक करतात.
- आकर्षक संदेशांच्या जाळ्यात अडकू नये.
- मॅसेज किंवा व्हॉट्सॲपच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
- व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन तुम्ही हे ब्लॉक करू शकता.
- बाहेरील व्यक्ती तुम्हाला कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड करू शकत नाही असा पर्याय उपलब्ध आहे.