Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शहरे सुरक्षित करण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’! आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘व्हाट्सऍप चॅट बॉट’ इतर महापालिकांमध्येही राबवला जाणार!

January 22, 2022
in घडलं-बिघडलं
0
ChatBooth

मुक्तपीठ टीम

शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग‘ उपक्रमात सुचवण्यात आलेले उपाय राज्यातील सर्व महानगरपालिकामध्ये राबवण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. हे उपाय शहरांचे रूप पालटून टाकण्यासाठी अत्यंत आवश्यक असून त्यासाठी गरज वाटल्यास या महानगरपालिकांना नगरविकास विभागाच्या वतीने आर्थिक मदत देण्याची तयारीही  त्यांनी दर्शवली.

            

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने व्हाट्सऍप चॅट बॉट आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे सुरक्षित शाळा उपक्रमांचे ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            

आठ दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्हाट्सएप चॅट बॉट या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या नवीन सुविधेमार्फत तब्बल ८० सुविधा चॅट बॉटच्या माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेला हा प्रकल्प इतर महानगरपालिकांनी देखील राबवावा यासाठी आज या सुविधेचे सादरीकरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

            

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या चॅटबॉटमुळे उत्तम सेवा नागरिकांना पुरविता येणार असून त्यामुळे कामकाजाला गती मिळेल, शिवाय पारदर्शकता वाढीस लागणार असून नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून हे चॅटबॉट जनतेला सुविधा देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  जवळपास दोन वर्षांपासून कोविड-19 महामारीमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करीत आहोत. मात्र या काळातही नागरिकांना घरबसल्या आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा प्रकल्प नक्कीच सर्व महानगरपालिकांसाठी पथदर्शी ठरणार आहे. पारदर्शकता, तत्परता याबरोबरच शासनाप्रती विश्वासार्हता वाढविण्यासाठी हा प्रकल्प नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

            तर दुसरीकडे राज्याचे वेगाने नागरीकरण होत असताना होणारा विकास हा शाश्वत व्हावा तसेच ‘इज ऑफ लिव्हिंग‘मध्ये तो बदलण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाचा आढावा वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट या संस्थेने सादर केलेल्या सादरीकरणातून मांडण्यात आला. शहरातील शाळेचा परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित करण्यासाठी अनेक संकल्पना यावेळी सादर करण्यात आल्या. या संकल्पना अत्यंत साध्या आणि सोप्या असून त्याद्वारे शहरांतर्गत नागरिकांची सुरक्षितता वाढणार आहे. असे प्रकल्प राज्यातील महानगरपालिकामध्ये राबवणे शक्य असून त्यासाठी टप्प्याटप्प्याने कालबद्ध रीतीने काम करावे लागणार आहे. त्यासाठी नगरविकास विभाग पुढाकार घ्यायला तयार असून महानगरपालिकाना काही निधी द्यायला देखील तयार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.  आज सादर झालेल्या या संकल्पनांचे  नगर रचनाकारांच्या मदतीने शैक्षणिक संस्थांच्या परिसर सुरक्षित करण्यासाठी काम करावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना केले.


Tags: aditya thackerayease of livingEknath ShindeWhatsapp chat botआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेव्हाट्सएप चॅट बॉट
Previous Post

शाळांनी कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालनाचे प्रा.वर्षा गायकवाडांचे निर्देश

Next Post

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रविवारी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिंकाशी ऑनलाईन संवाद

Next Post
cm uddhav thackeray

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त रविवारी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिंकाशी ऑनलाईन संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!