मुक्तपीठ टीम
राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अधिक उत्साहात आहे. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करावी, अशा चर्चा सुरु होती. मात्र, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतले असले तरी काँग्रेसच्या दोन पैकी एकाही उमेदवाराचा अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात उरलेले आहेत. त्यामुळे आता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतील भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्याकडे किती बळ आहे, कोणाला आणखी काय करावं लागेल, याचा घेतलेला हा वेध.
१० जागांसाठी एकूण ११ उमेदवार रिंगणात!!
- महाराष्ट्रात विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक आहे.
- भाजपाच्या सदाभाऊ खोत यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
- राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनीही अर्ज मागे घेतला आहे.
- यामुळे भाजपाचे एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात उभे आहेत.
- याशिवाय शिवसेनेने दोन, काँग्रेसने दोन आणि राष्ट्रवादीने दोन उमेदवार आहेत.
- १० जागांसाठी एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत.
गुप्त मतदानामुळे धाकधूक वाढली…
- राज्यसभा निवडणुकीत खुली मतदान प्रक्रिया असते, तर विधानपरिषदेत मतदान गुप्त प्रक्रियेने होते.
- म्हणजेच कोण कोणाला मत देणार हे कोणालाच माहीत नसते.
- राज्यसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये काळजीचं वातावरण आहे.
भाजपाचे चार उमेदवार सहज, पाचव्यासाठी रणनीती!
- विधानसभेत भाजपाचे १०६ आणि ७ अपक्षांसह एकूण ११३ आमदार आहेत. त्यात भाजपाने आणखी १० मते आघाडीच्या गोटातील मिळवली होती.
- विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २६ ते २७ आमदारांचा पाठिंबा लागतो.
- त्यानुसार भाजपाचे चार सदस्य सहज विधान परिषदेवर जाऊ शकतात.
- पाचवे उमेदवार असणाऱ्या प्रसाद लाड यांच्यासाठी भाजपाला रणनीती वापरावी लागणार आहे.
- सहावे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या माघारीनंतर भाजपाचे पाचच उमेदवार रिंगणात आहेत.
शिवसेनेने दोन उमेदवार! मते उरणार!
- विधानसभेत शिवसेनेचे एकूण ५५ आमदार आहेत. त्यांना पाठिंबा देणारे ९ आमदार आहेत.
- शिवसेनेने दोन उमेदवार उभे केले आहेत.
- म्हणजेच शिवसेना दोन जागा सहज जिंकू शकते.
- त्यांच्याकडे स्वत:ची किमान एक-दोन अतिरिक्त मते आहेत.
- ती आघाडीच्या इतर उमेदवारासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
- राज्यसभेच्या अनुभवानंतर शिवसेना जास्त मते अतिरिक्त ठेवल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीची अडचण होईल.
राष्ट्रवादीचे दोन उमेदवार, आवश्यकता भासू शकेल!
- विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत.
- नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत.
- त्यामुळे राष्ट्रवादीची आमदार संख्या ५१वर येईल.
- त्यात शिवसेनेची अतिरिक्त मते मिळाली तर कोटा पूर्ण होईल.
- म्हणजेच राष्ट्रवादीही दोन जागा मिळवू शकते.
- राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनी माघार घेतल्यानंतर आता दोनच उमेदवार रिंगणात आहेत.
काँग्रेसला भाई जगतापांसाठी मते लागणार!
- विधानसभेत काँग्रेसचे ४४ उमेदवार आहेत.
- त्यामुळे काँग्रेस एक जागा सहज जिंकू शकते, पण दुसऱ्या जागेसाठी त्यांना १० अतिरिक्त मतांची व्यवस्था करावी लागणार आहे.
- सुमारे १७ लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.
- त्यांचा पाठिंबा मिळवता आला तर काँग्रेसचा दुसरा उमेदवारही जिंकू शकेल.
एका जागेसाठी लढत, गुप्त मतदानामुळे टेन्शन!
- काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप आणि भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांच्यात लढत होईल.
- भाजपाचे पाठिंबा दिलेल्या अपक्षांसह बळ ११३ आहे.
- त्यामुळे अतिरिक्त किमान १३-१४ मते लागतील.
- भाजपाने राज्यसभेला मिळालेली पहिल्या पसंतीच्या मतांची संख्या १२३ आहे, ती पुन्हा मिळवली तरी भाजपाला ४ मते आणखी जास्त लागतील.
- काँग्रेसला १० मते कमी पडतात, पण राज्यसभेला आघाडीला मिळालेली १६१ आमदारांची मते लक्षात घेतली तर काँग्रेससाठी लढत फार अवघड वाटत नाही.
- पण विधान परिषदेचं मतदान गुप्त असल्याने भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांना टेन्शन असणार.