मुक्तपीठ टीम
९ मार्च रोजी भारताचे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किमी आत पडले आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने हे मान्य केले आहे. पाकिस्तानच्या पंजाबमधील मियां चन्नू शहरात भारतीय क्षेपणास्त्र अचानक पडले. यावर पाकिस्तानने आपला आक्षेप व्यक्त केला असून भारताने या गंभीर प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात क्षेपणास्त्रामध्ये तांत्रिक दोष असल्याने संबंधित प्रकार घडल्याचे सांगितले आहे. या घटनेवर संरक्षण मंत्रालयाने तीव्र खेद व्यक्त केले आहे.
उच्चस्तरीय चौकशी न्यायालयाची स्थापना…
- मंत्रालयाने सांगितले की, या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.
- संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ९ मार्च रोजी क्षेपणास्त्राच्या नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र अचानक उडाला.
- भारताने ही बाब गांभीर्याने घेतली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
- हे क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये पडल्याची माहिती मिळते आहे.
- ही दुःखद घटना आहे, पण यात एकाचाही मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे.
- या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की सरकार या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी करणार आहे.
क्षेपणास्त्र ४०,००० फूट उंचीवर घिरट्या घालत होते…
- या घटनेनंतर पाकिस्तानने शुक्रवारी इस्लामाबादमधील भारतीय राजदूताला बोलावून क्षेपणास्त्र आपल्या क्षेत्रात पडल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला.
- परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे क्षेपणास्त्र ९ मार्च रोजी संध्याकाळी ६:४३ वाजता अचानक डागले आणि संध्याकाळी ६:५० वाजता पाकिस्तानी पंजाबमधील मियां चन्नू शहराजवळील एका शेतात पडले.
- हे क्षेपणास्त्र ४०,००० फूट उंचीवर घिरट्या घालत होते.
- पाकिस्तानने दावा केला आहे की निशस्त्र भारतीय सुपरसॉनिक क्षेपणास्त्र बुधवारी संध्याकाळी सिरसा येथून उड्डाण केले आणि १२४ किमी अंतरावर पाकिस्तानी हद्दीत आले.
- हे क्षेपणास्त्र ४०,००० फूट उंचीवर घिरट्या घालत होते भारतीय आणि पाकिस्तानी हवाई हद्दीतील प्रवासी उड्डाणे आणि जमिनीवरील नागरिक आणि मालमत्तेलाही धोका निर्माण करत होते.