मुक्तपीठ टीम
१ जानेवारी २०२३, रविवारी पहाटे एका २० वर्षाच्या मुलीच्या स्कूटरला बलेनो कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. महिलेला कारने १२ किमी खेचून फरफटवत नेले आणि ते पाच आरोपी दारूच्या नशेत होते. कंझावला प्रकरणाचा तपास पोलिसांनी तीव्र केला आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी सांगितले की, पीडितेच्या पोस्टमॉर्टमसाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, पहाटे २ च्या सुमारास घडलेल्या या घटनेच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या आरोपीने अपघाताच्या काही तासांपूर्वीच कोणाकडून तरी कार उधार घेतली होती.
निर्भयापेक्षाही अमानुष असे दिल्लीतील नवे कंझावला प्रकरण आहे तरी काय?
- एफआयआरनुसार, दीपक खन्ना आणि अमित खन्ना यांनी त्यांचा मित्र आशुतोषकडून कार घेतली.
- अपघातानंतर कार परत त्याच्या घरी उभी केली.
- दोघांनी आशुतोषला दारू प्राशन केल्याचे सांगितले आणि कृष्णा विहार परिसरात कार स्कूटीला धडकली.
- नंतर ते कांझवालाच्या दिशेने पळून गेले.
- मात्र, आरोपीच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
- पोलिसांना सुलतानपुरीच्या कृष्ण विहार परिसरात अपघातग्रस्त स्कूटी सापडली.
- कांझवाला पोलिस स्टेशनला तीन पीसीआर कॉल आले की जोंटी गावातील हनुमान मंदिराजवळ एका मुलीचा नग्न मृतदेह पडला आहे.
- कांझवाला पोलिस स्टेशनच्या एसआयने एका व्यक्तीशी संपर्क साधला ज्याने पीसीआर कॉल केला आणि त्यांना समजले की करड्या रंगाची बलेनो कार अपघातात सामील आहे.
- त्यानंतर पोलिस बुधविहार, फेज-१ येथे पोहोचले जेथे कारचा मालक लोकेश होता.
- लोकेशने सांगितले की त्याची कार रोहिणी सेक्टर-१ मध्ये राहणारे नातेवाईक आशुतोष यांच्याकडे आहे.
- दुसरीकडे, आशुतोषने सांगितले की, त्याचे मित्र दीपक आणि अमित यांनी शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्याच्याकडून कार घेतली.
- रविवारी पहाटे पाचच्या सुमारास अपघातग्रस्त स्थितीत कार पार्क केली.
- पोलिस आल्यावर आशुतोषने दीपक आणि अमितला बोलावले.
- कांझवाला रोडवरील जोंटी गावाजवळ त्याने कार थांबवली तेव्हा स्कूटर चालवणारी मुलगी त्याच्या कारखाली पडल्याचे त्याने पाहिले.
- त्याच्या म्हणण्यानुसार ते घाबरले आणि मुलीला तिथेच सोडून पळून गेले.
- नंतर ते आशुतोषच्या घरी गेले आणि तिथे गाडी उभी करून आपापल्या घरी गेले.
- पत्रकार परिषदेला संबोधित करताना विशेष पोलिस आयुक्त सागरप्रीत हुड्डा म्हणाले की, पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुद्ध नवीन कलमे जोडली जाऊ शकतात.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कट रचून मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.