Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

अफगाणिस्तानवर कब्जा करून जगाला टेन्शन….’तालिबान’ आहे तरी कसं?

August 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
taliban

मुक्तपीठ टीम

२० वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तेव्हा सोव्हिएट रशियाने माघार घेतल्यानंतर काही वर्षात तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला तर आता अमेरिकेने पूर्ण माघार घेण्यापूर्वीच तालिबानच्या हाती अफगाणिस्तानची सत्ता सहजतेनं आली, एवढाच काय तो फरक! तालिबान आता बदलले वगैरे दावे करणाऱ्यांना चुकीचं ठरवण्याचं काम तालिबान वर्झन २ ने त्यांच्या क्रौर्यातून सुरु केलंय. अमेरिकेसारख्या महासत्तेलाही न जुमानणारी, संपवता न आलेली आणि जगासाठीही धर्मांध क्रूरतेमुळे टेन्शनचा विषय ठरलेली तालिबान ही संघटना आहे तरी कशी ते समजवून घेण्याचा हा प्रयत्न.

 

तालिबान म्हणजे काय?

  • पश्तून भाषेत तालिबान म्हणजे ‘विद्यार्थी’
  • हा शब्द तालिबानचा आरंभ जेथून झाला तो विद्यार्थी दशेचा काळ सुचित करतो.
  • तालिबानचा जन्म एका मदरशात झाला.
  • उत्तर पाकिस्तानमधील सुन्नी इस्लामचा कट्टरतावाद शिकवणारा हा मदरसा होता.
  • एका मदरशापासून सुरु झालेलं तालिबान पुढे कट्टरपंथी कुमार्गावर फोफावत गेला.
  • १९९० च्या सुरुवातीला तालिबान बळकट झाली.

 

तालिबान सुरुवातीला का लोकप्रिय?

  • अफगाणिस्तानातील सोव्हिएत सत्तेविरोधात लढणाऱ्या मुजाहिदीनना त्याकाळात पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेचाही पाठिंबा होता.
  • त्या मुजाहिदीनमध्ये तालिबानचाही समावेश होता. पण ते जाणीवपूर्वक वेगळंपण राखून होते.
  • सोव्हिएत सत्तेनंतर सुरवातीला अफगाणी नागरिकांची पसंती बाकी मुजाहिदीनपेक्षा तालिबानला होती.
  • भ्रष्टाचार आणि अराजकता संपवण्याचं आश्वासन तालिबानने दिल्याने ते अफगाणिस्तानात लोकप्रिय ठरले.

 

क्रूर हिंसाचारामुळे तालिबानची दहशत

  • तालिबानची हिंसक वृत्ती आणि इस्लामिक कायद्यांतर्गत क्रूर शिक्षा अफगाणींमध्ये दहशत पसरवत राहिली.
  • संगीत, टीव्ही आणि सिनेमावर बंदी होती.
  • पुरुषांना दाढी ठेवणे आवश्यक होते, स्त्रिया डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला झाकल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नव्हत्या.
  • तालिबानने १९९५ मध्ये हेरात आणि १९९६ मध्ये काबूल काबीज केले.
  • १९९८ पर्यंत जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य होते
  • २००१ मध्ये तालिबान्यांनी बामियानमध्ये बुद्धाच्या दोन मूर्ती उडवल्या.
  • २०१२ मध्ये तालिबानने मलाला युसूफझाई या शाळकरी मुलीला लक्ष्य केले.
  • मलालाला नंतर शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

तालिबान कोण चालवते?

  • तालिबानचे संघटनात्मक संचालन क्वेटा शुरा परिषद करते.
  • ही परिषद क्वेट्टा येथून काम करते.
  • २०१३ मध्ये तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर मारला गेला.
  • त्याचा वारसदार मुल्ला अख्तर मन्सूर २०१६ च्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला.
  • तेव्हापासून मौलवी हैबतुल्ला अखुंदजादा तालिबानचा कमांडर आहे.
  • उमरचा मुलगा मुल्ला मुहम्मद याकूबही हैबतुल्लासोबत आहे.
  • याशिवाय तालिबानचे सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार आणि हक्कानी नेटवर्कचे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी हे देखील तालिबानमध्ये महत्वाच्या भूमिकेत आहेत.

 

तालिबानची आर्थिक ताकत

  • तालिबानकडे पैशांची कमतरता नाही.
  • सत्तेवर नसतानाही तालिबानची दहशत अफगाणिस्तानच्या अनेक भागांमध्ये होती.
  • तालिबानचे उत्पन्न दरवर्षी १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
  • एका अंदाजानुसार, त्यांनी २०१९-२० मध्ये १.६ अब्ज डॉलर्स कमावले. तालिबानच्या उत्पन्नाचे स्त्रोत हे एखाद्या सरकारसारखे वेगवेगळ्या व्यवसायांमधून आणि गुन्हेगारी टोळ्यांसारखे खंडणीवसुलीतूनही आहेत.
  • तालिबानला त्यांच्या मित्र राष्ट्रांकडूनही मदत मिळत असते.
  • रशिया, इराण, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया सारख्या देशांकडून १० कोटी डॉलर्स आणि ५० कोटी डॉलर्स पर्यंत मदत मिळते असे सांगितले जाते.

 

तालिबान, अमेरिका आणि अफगाणिस्तान

  • अफगाणिस्तानातून १९८९मध्ये सोव्हिएट माघारीनंतर तालिबानने आपले वर्चस्व वाढवले.
  • तालिबानने १९९६ मध्ये काबूल काबीज केले.
  • पकडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाहची निर्घृण हत्या केली.
  • तेव्हाही पाकिस्तानने तालिबानी सत्तेला लगेच मान्यता दिली. सोबत सौदी अरेबियानेही तेच केले.
  • ९/११ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने तालिबानवर त्वरित कारवाई केली. तालिबानने ओसामा बिन लादेनला सोपवण्यास नकार दिला.
  • २००२ मध्ये नाटोने अफगाणिस्तानची सुरक्षा ताब्यात घेतली. हमीद करझाई हे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले.
  • अफगाणिस्तानचे नवीन संविधान २००४ मध्ये तयार केले गेले. करझाई हे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले.
  • २००९ मध्ये अमेरिकेने आणखी १,४०,००० सैन्य पाठवले.
    २०११ मध्ये अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पाकिस्तानमध्ये ठार केले.
  • २०१३ मध्ये तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा कराचीत मृत्यू झाला.
  • अमेरिकन सैन्याच्या तैनातीत कपात २०१४ मध्ये सुरू झाली. अफगाण सुरक्षा दलांनी जबाबदारी स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे दहशतवाद वाढू लागला.
  • २०१४ पासून अमेरिका येथे सैन्याची संख्या कमी करत आहे.
  • त्याचा फायदा घेत तालिबानने आपली पकड मजबूत करणे सुरू ठेवले.
  • या वर्षी जेव्हा अमेरिकेने माघार घेण्याची घाई दाखवली तेव्हा तालिबानला संधी मिळाली.
  • काही आठवड्यांपूर्वी झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे अफगाणिस्तानात एकही अमेरिकन लढाऊ विमान नाही.
  • अफगाणिस्थान हवाई दलाची विमाने दुरुस्त करणारे मेकॅनिकही गेले आहेत. दुसरीकडे, तालिबानकडे सुमारे ८५,००० लढवय्ये आहेत.
  • एप्रिलमध्ये अमेरिकेने तालिबानशी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याचा करार केला.
  • तेव्हापासून तालिबानने अनेक वर्षे ताब्यात नसलेली क्षेत्रही काबीज केली. टप्प्याटप्प्यानं जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा केला.
  • त्यामुळे अमेरिका जाण्यापूर्वीच अफगाणिस्तानावर ताबा मिळवणे तालिबानला सहज शक्य झाले.

Tags: AfghanistanAmericatalibanअफगाणिस्तानअमेरिकातालिबान
Previous Post

“आयटी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्काराने गौरविणार”

Next Post

नाशिकमधील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, केली पैशाची मागणी

Next Post
facebook-bjp

नाशिकमधील भाजप नगरसेवकाचे फेसबुक अकाऊंट हॅक, केली पैशाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!