मुक्तपीठ टीम
नवीन वर्षात मार्चमध्ये संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होऊ शकते. नवीन संसद भवनाचे काम वेगाने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नव्या संसद भवनात होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. नवीन इमारतीत काय खास आहे त्यावर लक्ष टाकूया…
नवीन संसद भवनात काय आहे खास…
- नवीन संसद भवन पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे.
- ज्यामध्ये अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर काम केले जाणार आहे.
- एकूण ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रात बांधण्यात आलेले नवीन संसद भवन जवळपास तयार झाले आहे.
- ही इमारत ४ मजली आहे.
- नवीन संसद भवनात जाण्यासाठी ६ मार्ग असतील.
- पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी एक प्रवेशद्वार असेल.
- नवीन संसद भवनात लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष, खासदारांच्या प्रवेशासाठी १ प्रवेशद्वार आणि २ सार्वजनिक प्रवेशद्वार दिसतील.
- नवीन संसद भवनात एकूण १२० कार्यालये आहेत.
- ज्यामध्ये समिती कक्ष, संसदीय कामकाज मंत्रालयाची कार्यालये, लोकसभा सचिवालय, राज्यसभा सचिवालय, पंतप्रधान कार्यालय इत्यादी आहेत.
- नवीन संसद भवनात सेंट्रल हॉल नाही आहे.
- लोकसभा चेंबर ३०१५ चौरस मीटर परिसरात बांधण्यात आले आहे.
- त्यामध्ये ५४३ जागांच्या ऐवजी ८८८ जागा असतील.
- संयुक्त अधिवेशनादरम्यान १२२४ खासदार लोकसभेच्या चेंबरमध्ये एकत्र बसू शकतील.
- राज्यसभेत एकूण ३,२२० चौरस मीटर क्षेत्रफळात असेल, ज्यामध्ये २४५ ऐवजी ३८४ जागा असतील.
- नवीन इमारतीतील कार्यालयांमध्ये पेपरलेस काम केले जाणार आहे.
- त्यात लायब्ररी, लाउंज, खासदारांसाठी जेवणाचे ठिकाणही असेल.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दोन टप्पे…
- अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात बोलावण्यात आले आहे.
- पहिला टप्पा ३० किंवा ३१ जानेवारीला सुरू होतो.
- दरम्यान राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतात.
- या टप्प्यात १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो.
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ८ किंवा ९ फेब्रुवारीला संपणार आहे.
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा साधारणत: मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू होतो आणि मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालतो.