मुक्तपीठ टीम
तब्बल दीड लाख किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं एक वादळ सुसाट निघालंय. हे शक्तिशाली सौर वादळ आहे. ते पृथ्वीच्या दिशेने अतिशय वेगाने पुढे येत आहे. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सौर वादळाचा वेगही वाढू शकतो. हे वादळ रविवारी किंवा सोमवारी ते पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानिमित्तानं सौरवादळ काय असतं आणि ते खरंच पृथ्वीचं नुकसान करु शकते का, त्याचा घेतलेला वेध.
सौर वादळाचा पृथ्वीवर कसा परिणाम होणार?
- या सौर वादळामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतो.
- जे लोक उत्तर किंवा दक्षिण अक्षांशांमध्ये राहतात त्यांना रात्री सुंदर ऑरोरा दिसू शकतो.
- पृथ्वीच्या ध्रुवांजवळ रात्रीच्या आकाशात चमकणाऱ्या प्रकाशाला ऑरोरा म्हणतात.
- शास्त्रज्ञांच्या मते या सौर वादळामुळे पृथ्वीचे बाह्य वातावरण गरम होऊ शकते.
- याचा थेट परिणाम पृथ्वीभोवतीच्या कृत्रिम उपग्रहांवर होण्याची शक्यता आहे.
- जीपीएस नेव्हिगेशन, मोबाइल फोन आणि सॅटेलाइट टीव्ही चॅनल्सच्या सिग्नलवरही परिणाम होऊ शकतो.
- त्याच वेळी विद्युत वाहिन्यांच्या जाळ्यावरही दुष्परिणामांची भीती आहे.
- त्यामुळे ट्रान्सफॉर्मर खराब होऊ शकतात.
पृथ्वीकडेही आहे संरक्षक ढाल!
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र त्याविरुद्ध संरक्षणात्मक ढाल म्हणून कार्य करते, म्हणून सौर वादळाचा जास्त होण्याची शक्यता नगण्य आहे.
याआधीच्या सौर वादळांचे अनुभव काय सांगतात?
- यापूर्वी १९८९ मध्ये असं सौर वादळ आले होते.
- कॅनडाच्या क्यूबेक शहरातील वीज सुमारे १२ तास गेली.
- त्या शहरातील खूप त्रास सहन करावा लागला.
- १८५९ मध्ये भौजियो मॅग्नेटिक वादळ आले होते, त्या वादळामुळे युरोप आणि अमेरिकेतील टेलिग्राफ नेटवर्कवर दुष्परिणाम झाला होता.