मुक्तपीठ टीम
मुंबईतील शंभरावर सेलिब्रिटींना लक्ष्य करणाऱ्या सेक्स्टॉर्शन रॅकेटचा सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छडा लावला. सायबर खंडणीखोरांना जेरबंदही केलं. पण अनेकदा मुळात इंटरनेटवरील सेक्सचं आमिष हे आमिष आहे. सेक्स्टॉर्शन म्हणजे सेक्सच्या आमिषाआडून खंडणीवसुलीचा डाव आहे, हेच अनेकांना माहित नसते. त्यामुळेच सेक्स्टॉर्शन म्हणजे नेमकं काय आणि तो धोका कसा टाळावा, ते समजवण्याचा हा प्रयत्न:
सेक्स्टॉर्शनचा हनी ट्रॅप असतो कसा?
- एखाद्या पुरुष सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर स्त्रीचा आमिषासारखा वापर केला जातो, त्याला हनी ट्रॅप म्हणतात. सेक्स्टॉर्शनसाठी तसाच सेक्सचा आमिषासारखा वापर केला जातो.
- लाइव्ह सेक्स दाखवून किंवा एखादी स्त्री कपडे काढत, निर्वस्त्र होताना, कामूक चाळे करत दाखवली जाते.
- अनेकदा ती स्त्री लाइव्हही नसते. रेकॉर्डेड क्लिप असते. अथवा पॉर्न वेबसाइटवरून घेतलेलीही असू शकते.
- तिला पाहण्यासाठी सावज आधी शुल्कही भरतात, अनेकदा त्यांना कल्पना नसते की त्यांच्या पीसी किंवा लॅपटॉप किंवा मोबाइला त्या अॅपने हॅक केले आहे.
- काहीवेळा सावजाच्या कॅमेऱ्याचा अथवा त्यात सोडलेल्या मालवेअरचा वापर करून स्क्रिन रेकॉर्ड केली जाते.
- त्यानंतर ती क्लिप सावजाला पाठवून उघड करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले जाते.
- काहीवेळा सावज जुमानत नाही तेव्हा तशा क्लिप अपलोड करून त्याच्या लिंक सावजाला पाठवल्या जातात.
- सर्वात धोकादायक म्हणजे खंडणी वसुलीनंतरही अशा क्लिप सेक्स वेबसाइटना विकल्या जातात.
क्लिक करा आणि वाचा:
बॉलिवूड सेलिब्रिटीही सेक्स्टॉर्शनचे बळी!
सेक्स्टॉर्शनचा धोका कसा टाळाल?
- सर्वात चांगला मार्ग म्हणजे सेक्सशी संबंधित अशा ऑनलाइन आमिषांना टाळा.
- अनेकदा भावना अनावर होतात, असे कारण सांगितले जाते. अगदीच अपरिहार्य असेल तर त्यासाठी इतर सुरक्षित पॉर्न वेबसाइटवर ते पाहा.
- खरंतर कोणत्याही अशा वेबसाइटवर ऑनलाइन पेमेंट करून ते पाहणे धोकादायकच.
- त्यातून ज्यांचं अस्तित्व तुम्हाला माहित नाही त्यांच्याकडे तुम्ही क्रेडिट कार्ड, बँक अकाऊंट अन्य गोपनीय ठेवावी ती माहिती उघड करत असता.
- लाइव्ह सेक्स व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होण्याचा मोह टाळाच टाळा.
- अशा आमिषांच्या माध्यमातून सावजाच्या भावना अधिक चाळवून मग त्याला कपडे काढायला लावायचे आणि ती रेकॉर्डेड क्लिप ब्लॅकमेलिंगसाठी वापरायची असा कट असतो, हे भावना कितीही अनावर झाल्या तरी विसरू नका.
- तुमच्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस कायम सक्रिय ठेवा. अशा वेबसाइटबद्दल तेही सावध करतील. रोखतील.
- मोह टाळणं, पॉर्न पाहतानाही मर्यादा पाळणे हेच धोका टाळण्याचे उपाय आहेत.