मुक्तपीठ टीम
गेल्या काही वर्षात पाश्चात्य देशांमध्येच नाही तर जगभरात सर्वत्र हॅलोवीन साजरे करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. अशीच एका हॅलोवीन पार्टी रंगलेली असताना दक्षिण कोरियात घडलेली घटना खूप धक्कादायक आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या इटवॉन भागात आयोजित हॅलोवीन फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरीत १५०हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो लोक जखमी झाले तर काहींना हृदयविकाराचा झटकाही आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत लोक इकडे तिकडे पळताना आणि चिरडताना दिसत आहेत. या अपघातानंतर भारतीय लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे की, अखेर हॅलोविन आहे तरी का?
Horrible scenes from South Korea#지구에서년지성아_환영해 #southkorea #korea #halloween #Itaewon
NSFW pic.twitter.com/0enMWoCRD1
— 악마 (@mashsomethingyo) October 30, 2022
#이태원
Most heartbreaking and tragic incident in Itaewon Halloween parade. Multiple people dead due to cardiac arrest.😭 pic.twitter.com/Sh25DrGO3J— Saurav Bajoria (@saurav_bajoria) October 29, 2022
हॅलोवीन म्हणजे नेमक काय?
- हा पाश्चात्य देशांमधील ख्रिश्चन धर्मीयांचा उत्सव आहे.
- पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी हा त्याचा उद्देश आहे.
- आता त्याचा इव्हेंट साजरा केला जातो
- या दिवशी लोकांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे त्यांची खूप चर्चा होते.
- ऑल हॅलोज डेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ ऑक्टोबरच्या रात्री हॅलोवीन साजरा केला जातो.
- भूतांसारखे मुखवटे आणि पोशाख परिधान करून हॅलोविन साजरा केला जातो.
- त्यांचा गेटअपही भूतांसारखाच असतो.
हॅलोवीन कसा केला जातो साजरा?
- या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे हॅलोवीनचा पोशाख.
- लोक भूतांसारखे कपडे घालतात आणि एकमेकांच्या घरी जातात आणि भेटवस्तू देतात.
- अनेक शहरांमध्ये मोठे कार्यक्रमही आयोजित केले जातात.
- पोकळ भोपळ्यासारख्या पिशव्या घेऊन मुले या दिवशी घरोघरी जातात.
- हे भोपळे शेवटी गोळा करून पुरले जातात.
- वेशभूषेनुसार, लोक राक्षस, भूत, कंकाल, पिशाच, डायन आणि ममीचे रूप धारण करतात.
हॅलोवीन फक्त ३१ ऑक्टोबरलाच का?
- ऑल हॅलोज डे १ नोव्हेंबर रोजी आहे.
- सेल्टिक कॅलेंडरचा पहिला दिवस.
- याच्या एक दिवस आधी सेल्टिक कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस असतो.
- तो ऑल सेंट्स इव्ह, ऑल हॅलोज इव्ह, आणि ऑल हॅलोवीन या नावांनी ओळखले जातो.
- नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपासून जसा सेलिब्रेशन सुरू होते, त्याचप्रमाणे हॅलोवीनही ३१ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून सुरू होतो.