मुक्तपीठ टीम
आर्थिक पाहणी अहवाल हा अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण आणि अविभाज्य घटक असतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल लोकसभेत मांडला. अहवालाने पुढील आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जीडीपी वाढीचा दर ८-८.५% च्या जवळपास राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकास दर ९.२ टक्के असण्याचा अंदाज आहे.
आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय?
- आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा लेखा-जोखा असतो.
- या आर्थिक पाहणी अहवालच्या दस्ताऐवजातून सरकार देशाची आर्थिक स्थिती कशी आहे, याची माहिती देते.
- सरकारच्या योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे.
- संपूर्ण आर्थिक वर्षात विकासाची काय दिशा राहिली.
- कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक झाली आदींबाबत माहिती असते.
- अर्थसंकल्पाआधी सादर होणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालात आगामी आर्थिक वर्षांसाठी जीडीपीचा अंदाज वर्तवण्यात येतो.
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं?
- आर्थिक पाहणी अहवाल हा मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) यांच्या नेतृत्वातील एक टीम तयार करते.
- यामध्ये CEA यांच्यासोबत आर्थिक बाबींच्या तज्ज्ञांचा समावेश असतो.
- केंद्र सरकारने अर्थ तज्ज्ञ व्ही. अनंत नागेश्वरन यांची नुकतीच मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली.
- त्यांच्या आधी के. व्ही. सुब्रम्हण्यम हे मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाला.
या महत्वाच्या गोष्टी
- यातून देशाच्या एकूण आर्थिक स्थितीचा तपशील मिळतो. ते वाचणे आर्थिक तज्ञ आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे.
- हा अहवाल केंद्रीय विषय किंवा थीमवर आधारित आहेत. गेल्या वर्षी त्याचा फोकस ‘जीवन आणि उपजीविका वाचवणे’ होता. आर्थिक सर्वेक्षण २०१७-१८ गुलाबी होते, कारण त्याची मुख्य थीम महिला सक्षमीकरण होती.
- भारताचे पहिलापाहणी अहवाल १९५०-५१ मध्ये सादर करण्यात आले. सुरुवातीला ते १९६४ पर्यंत अर्थसंकल्पासोबत सादर केले जात होते, परंतु नंतर ते स्वतंत्रपणे सादर केले गेले..
- पाहणी अहवाल सादर करणे सरकारला बंधनकारक नाही. त्याच्या पहिल्या विभागात केलेल्या शिफारशीही सरकारवर बंधनकारक नाहीत.