Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॉमेडीचे बादशाह राजू श्रीवास्तव मृत्यूशी झुंज: ते ब्रेन डेड झाले म्हणजे नेमकं काय झालं?

August 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
What Is Brain Dead know in marathi

मुक्तपीठ टीम

आपल्या विनोदाने खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आता राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूने काम करणं बंद केल्याची माहिती समोर आली आहे. राजू श्रीवास्तव ब्रेन डेड झाल्याRची माहिती आहे. सोशल मीडियावर तर त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवली जात आहे, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज सुरुच आहे. दरम्यान, ब्रेन डेड म्हणजे काय असतं हे जाणून घेऊ…

राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी ते व्हेंटिलेटरवर असल्याची पुष्टी केली आहे. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांनी कोणत्याही प्रकरच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. श्रीवास्तव यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. राजू श्रीवास्तव यांचा मेंदू जवळपास मृत झाला आहे. त्याचं हृदयही नीट काम करत नाही. राजू श्रीवास्तव यांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र आणि नातेवाईक रुग्णालयात पोहोचले आहेत. ही बातमी कळल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की ब्रेन डेड म्हणजे काय? आपल्या मेंदूमध्ये असे काय होते की त्याला मृत घोषित केले जाते?

ब्रेन डेड म्हणजे काय?

  • ब्रेन डेड अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदू प्रतिसाद देणे थांबवतो.
  • एखाद्या व्यक्तीचा ब्रेन डेड झाल्यानंतरही त्याचे हृदय धडधडत राहते परंतु मेंदूच्या त्या भागाद्वारे होणार्‍या क्रिया शरीर करणे थांबवते.
  • या स्थितीत शरीराची हालचाल, डोळ्यांच्या बाहुल्यांचा प्रतिसाद यावर परिणाम होतो.
  • ब्रेन डेड रुग्णांचा मेंदू कार्य करणं थांबतो पण त्यांचं हृदय, फुफ्फुस, किडनी, यकृत असे अवयव काम करत असतात.
  • तुम्हाला ब्रेन डेड व्यक्ती झोपलेली दिसेल.
  • रुग्ण स्वतःहून श्वासोच्छवास करू शकत नाही.
  • अशा स्थितीत, रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते जेणेकरून त्याचा श्वासोच्छ्वास चालू राहील.
  • ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या हालचालीही नसतात.
  • जर ब्रेन डेड घोषित केले तर त्याचा अर्थ कायदेशीररित्या मृत आहे.
  • ब्रेन डेडच्या तारखेलाच त्याचे मृत्यू प्रमाणपत्र दिले जाईल. पुढचे काही दिवस त्याचा श्वासोच्छ्वास सुरू राहिला तरीही तीच तारीख मानली जाते.
  • ब्रेन डेडमध्ये काही रुग्ण फक्त काही तास जगू शकतात, तर काही रुग्ण बरेच दिवस जगू शकतात.

Tags: Brain deadRaju Srivastavब्रेन डेडराजू श्रीवास्तव
Previous Post

एल. एल. एम. विधी अभ्यासक्रम मान्यतेसाठीच्या प्रस्तावात घोटाळे?

Next Post

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात सुपरवायजर आणि इतर पदांवर अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

Next Post
becil

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात सुपरवायजर आणि इतर पदांवर अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!