Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाच्यावेळी टेलिप्रॉम्प्टर खरंच बंद झाला की आणखी काही? ट्विटर मात्र भलतंच रंगलं…

January 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
PM Modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इनविझिबल टेलिप्रॉम्प्टर वापरून भाषण करतात, असा आरोप काँग्रेस नेहमीच करत असते. काँग्रेस नेते राहुल गांधी तर नेहमीच त्यावरून पंतप्रधानांची खिल्लीही उडवतात. सोमवारी रात्री तर राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट करत त्यांना लक्ष्य केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाच्यावेळी टेलिप्रॉम्प्टर खरंच बंद झाला की आणखी काही? अशी चर्चा चांगलीच रंगली आहे. पण एक मात्र नक्की झालं, की मोदी हे स्वत:च्या मनानं नाही तर टेलिप्रॉम्पर वाचून भाषण करतात, असा काँग्रेसचा गेल्या काही वर्षांपासूनचा आक्षेप सर्वत्र प्रभावीरीत्या पसरवण्याची संधी त्या पक्षाच्या नेत्यांना मिळाली.

 

टेलिप्रॉम्प्टर बिघडला आणि राजकारण रंगलं…

  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)या संघटनेची १७ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये परिषद सुरु आहे.
  • तेथे दरवर्षी WEFचे आयोजन केले जाते.
  • WEFच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हर्च्युअल भाषण होते.
  • त्यांच्या भाषणादरम्यान अचानक काही तांत्रिक बिघाड झाल्याने पंतप्रधानांना भाषण मध्येच काही वेळ थांबवावे लागले.
  • यादरम्यान पंतप्रधान तेथे उपस्थित लोकांना खुणावताना दिसले.
  • काही वेळातच या घटनेची व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली.
  • पंतप्रधान टेलिप्रॉम्प्टरकडे पाहून भाषण वाचत असल्याचे सांगत काँग्रेस नेते आणि समर्थकांनी टीका करण्यास सुरुवात केली.

नेमकं कसं घडलं, कसं बिघडलं?

  • ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, पीएम मोदी WEFमध्ये भाषण सुरू करतात.
  • बोलत असताना अचानक पंतप्रधान थांबतात आणि त्यांच्या डावीकडे पाहतात.
  • त्यानंतर पंतप्रधान ते खुणावतातही. पण बहुदा कोणाचे पटकन लक्ष गेले नसावे. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेचे भाव येतात.
  • ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष क्लॉस श्वाब यांना विचारतात.
  • “क्लॉस शेवाबजी, तुम्ही नीट ऐकत आहात का? आणि आमच्या दुभाष्याचा आवाजही सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का?
  • यावर अध्यक्ष क्लॉज म्हणतात की
  • “आवाज येत आहे, आम्ही तुम्हाला ऐकू शकतो, श्रीमान पंतप्रधान.”
  • यानंतर पीएम मोदींनी सुरुवातीपासून पुन्हा आपले भाषण सुरू केले.
  • त्यांनी सुमारे अर्धा तास वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला संबोधित केले.
  • टीव्ही स्टुडिओंपेक्षा ट्विटरवर जास्त चालला टेलिप्रॉम्प्टर…

 

हा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून लिहिले

“टेलीप्रॉम्प्टर देखील इतके खोटे सहन करू शकत नाही.”

 

इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2022

 

तर दुसरीकडे काँग्रेसच्या ट्विटर हँडलने ट्वीट केले….

“हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।
#TeleprompterPM”

हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।#TeleprompterPM

— Congress (@INCIndia) January 17, 2022

या घटनेनंतर अनेकांनी #TeleprompterPM या हॅशटॅगने ट्विट करण्यास सुरुवात केली.

 

एकीकडे काँग्रेस नेते पंतप्रधान मोदींना वाचून भाषण करत असल्याचे उघड झाल्याचे सुचवत त्यांच्यावर टीका करत असताना दुसरीकडे, भाजपा समर्थकांचा दावा आहे की पंतप्रधानांचे टेलिप्रॉम्प्टर खराब झालेलाच नाही.

उत्तरप्रदेशातील पत्रकार आणि सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे माध्यम सल्लागार शलभ त्रिपाठी यांनी ट्विटरवर दावा केला की.

 

“जे टेलीप्रॉम्प्टर त्रुटीबद्दल उत्साहित होते त्यांच्या लक्षात आले नाही की ही समस्या WEFची होती. पंतप्रधान मोदींशी संपर्क साधू शकले नाहीत, म्हणून त्यांनी त्यांना पुन्हा सुरुवात करण्याचा आग्रह केला.”

Don’t those getting excited at the tech glitch not realise that the problem was at WEF’s end? They were not able to patch PM, so requested him to start again, which is evident in the way Klaus Schwab said that he will again give a short introduction and then open up the session… pic.twitter.com/HblG1w0mfN

— Dr. Shalabh Mani Tripathi (मोदी का परिवार) (@shalabhmani) January 17, 2022

 

तर एका भाजपा समर्थक हॅडलने जगातील नेत्यांचे फोटो ट्वीट करत सर्वच नेते टेलिप्रॉम्प्टर वापरतात असा दावा केला.

Almost all leaders, news anchors, presidents and public addressing is done with teleprompter. Seriously we have some fools who belittle PM Modi on such petty things. #TeleprompterPM pic.twitter.com/RSi448BXKV

— Tushar Kant Naik ॐ♫₹ (@Tushar_KN) January 18, 2022

 

या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्रातील मराठी ट्वीटरकर मागे राहिलेत, असेही नाही. काही निवडक ट्वीट:

शेठ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अब्रू काढण्याची एक ही संधी सोडत नाही.
Teleprompter मध्ये घोळ झाला अन शेठची बोबडी वळली.
भक्त याला पण डिफेन्ड करतील यात सुद्धा तिळमात्र शंका नाहीpic.twitter.com/r5iif48XXG

— Pratik S Patil (@Liberal_India1) January 18, 2022

https://twitter.com/DrVrushaliRaut1/status/1483292693254270980?t=TEEPvmfdrVBE5B6HiUdVzw&s=19

 

मुक्तपीठ भूमिका

तांत्रिक समस्या उद्भवू शकते. कधीही, कुठेही, कोणाच्याहीबाबतीत ते घडू शकतं आणि बिघडवू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर आंतराष्ट्रीय पातळीवरील अशा परिषदांमध्ये अपवाद वगळता आधी तयार केलेले भाषणच वाचले जाते. ते योग्यही असते. कारण ते तोलून मापून खूप विचारांती तयार मांडलेले असते. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत जे घडले ते टेलिप्रॉम्प्टरची समस्या की आणखी काही याबद्दल दोन्ही बाजून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यात एक घडलं आहे ते असं की काहीवेळा लार्जर दॅन लाइफ प्रतिमा निर्माण करण्याच्या नादात स्वत:च्या नेत्याला अतिमोठे पण देतानाच दुसऱ्यांच्या नेत्याला अतिहिणवणे घडते. त्यातून मग असं काही घडलं की त्याचं असं राजकारण रंगवलं जातं.


Tags: BJPCongressPM Narendra modirahul gandhitwitterWEFकाँग्रेसटेलिप्रॉम्परपंतप्रधान नरेंद्र मोदीराहुल गांधीवर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
Previous Post

शेतकऱ्यांना जुन्या दराने खताची विक्री करावी- कृषिमंत्री दादाजी भुसे  

Next Post

शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी विमान प्रवास भाडे आगाऊ मिळणार   

Next Post
smss

शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी विमान प्रवास भाडे आगाऊ मिळणार   

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!