मुक्तपीठ टीम
नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. आता सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये यूजीसी अभ्यासक्रमांसाठी नवीन नियम जारी केले जातील. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने आगामी शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये राबविल्या जाणार्या चार वर्षांच्या पदवीपूर्व कार्यक्रमाचे नियम अंतिम केले आहे. यूजीसीनुसार, त्याचे नियम पुढील आठवड्यात देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये शेअर केले जातील.
नवीन विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांचा मिळणार पर्याय!
- पुढील सत्रापासून देशातील सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये ४ वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम लागू केले जातील.
- सर्व केंद्रीय विद्यापीठांसह बहुतेक राज्यस्तरीय आणि खासगी विद्यापीठे देखील ४ वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम राबवतील.
- याशिवाय देशभरातील अनेक ‘डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज’ देखील हा ४ वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम राबविण्यास संमती देणार आहेत.
- २०२३-२४ पासून, जेथे सर्व नवीन विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांचा पर्याय असेल, ४ वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची योजना जुन्या विद्यार्थ्यांसाठीही मंजूर केली जाऊ शकते.
- ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी सामान्य तीन वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे त्यांना पुढील सत्रापासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
यूजीसीच्या म्हणण्यानुसार, हा अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश घेण्याची सक्ती केली जाणार नाही. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास, ते आधीच सुरू असलेले तीन वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू ठेवू शकतात.
३ वर्षांचा अभ्यासक्रमही सुरू राहणार…
- विद्यार्थ्यांना सक्ती केली जाणार नाही. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास, ते आधीपासून सुरू असलेले ३ वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू ठेवू शकतात.
- यूजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदेश कुमार यांच्या मते, ४ वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची संपूर्ण योजना लवकरच सार्वजनिक केली जाईल.
आता UPSSSC PET २०२२च्या परीक्षेला होणार विलंब?
- चार वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या बाबतीत, यूजीसी विविध विद्यापीठांना काही नियम आणि कायदे तयार करण्याची परवानगी देईल.
- विद्यापीठांच्या शैक्षणिक परिषद आणि कार्यकारी परिषदेत याबाबत आवश्यक नियम निश्चित केले जाऊ शकतात.
- विद्यापीठांची इच्छा असल्यास ते अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाचा भाग बनण्याची संधीही देऊ शकतात.
- बदलाच्याबाबत, UGC चेअरमन म्हणाले की, FYUGP अंतर्गत फक्त नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी दिली जाईल आणि निकाल चार वर्षांनी कळेल. तर जुन्या विद्यार्थ्यांना त्यात बसण्याची संधी मिळाल्यास प्रथम निकाल लागेल.
५५ टक्के गुण आवश्यक!
चार वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर दोन वर्षांचा पदव्युत्तर आणि एमफिल करणार्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या प्रवेशासाठी ५५ टक्के गुण मिळणे बंधनकारक असेल. तसेच, एमफिल कार्यक्रम जास्त काळ चालू ठेवला जाणार नाही. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत केलेल्या बदलांमुळे हे केले जात आहे.