मुक्तपीठ टीम
शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावरील रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानंतर ऋषभ पंतच्या आलिशान कारला आग लागल्याने पंत थोडक्यात बचावले. त्याच्या या अपघातावर कपिल देव यांनी त्यांचे मत मांडत फक्त पंतलाच नाही तर इतर क्रिकेटर्सना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ऋषभ पंतसारख्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोणत्याही क्रिकेटपटूने अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. गेल्या आठवड्यातील अपघातासारखी परिस्थिती टाळण्यासाठी खेळाडूंनी स्वत: गाडी चालवण्याऐवजी ड्रायव्हर नेमावा.
खेळाडूंनी अधिक काळजी घेणे आवश्यक…
- ऋषभ पंत आपल्या आईला ‘सरप्राईज’ देण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात होता.
- प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना मॅक्स हॉस्पिटलच्या आयसीयूमधून खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.
- कपिल देव यांनी ‘एबीपी न्यूज’शी बोलताना सांगितले की, असे अपघात आपण टाळू शकतो.
- अशा विशेष खेळाडूंनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
- मी नवोदित क्रिकेटपटू असताना मला मोटारसायकल अपघाताला सामोरे जावे लागले होते.
- ते म्हणाले की, त्या दिवसापासून माझ्या भावाने मला मोटरसायकलला हातही लावू दिला नाही.
- ऋषभ पंत सुरक्षित असल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.
- खेळाडूंना काळजी घ्यावी लागते.
- त्याला स्वतः गाडी चालवायची गरज नाही.
- ते सहज ड्रायव्हर ठेवू शकतात.
पंतला अनेक दुखापती झाल्या…
- गुडघ्याच्या दुखापतीमुळे पंत किमान सहा महिने खेळापासून दूर असेल.
- या अपघातात त्यांच्या कपाळाला दोन कट आले आहेत.
- डीडीसीएचे अध्यक्ष श्याम शर्मा यांनी त्यांच्या बैठकीनंतर सांगितले की, गरज भासल्यास पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून दिल्लीला विमानाने नेले जाईल.
- पंत याच्यावर दोन छोट्या प्लास्टिक सर्जरी कराव्या लागल्याची माहितीही त्यांनी दिली होती.