मुक्तपीठ टीम
आजकाल काय घडेल यावर विश्वासच बसत नाही… दिल्लीच्या मुजफ्फरनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पाच महिन्यांपूर्वी वधू म्हणून आलेल्या मुलीचे वास्तव समजल्यावर सासू-सासऱ्यांनाही धक्का बसला आहे. सुशिक्षित सूनेच्या घरी येण्याचा आनंद नाहीसा झाला. सासरच्यांनी तिला कोंडून ठेवल्याचा आरोप तिने केला असता पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलीस ठाण्यात काही तास गोंधळ उडाला. सासरच्यांनी तिला घरात ठेवण्यास नकार दिला.
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात राहत असलेल्या युवकाचे लग्न २८ ऑक्टोबर २०२० रोजी सहारनपूर येथील रहिवासी असलेल्या एका तरुणीशी झाले होते. अगदी थाटामाटात या नववधूला घरी आणले होते. अशी माहिती मिळाली की, या वधूने लग्नानंतर अनेक महिने काही ना काही निमित्त देऊन आपल्या पतीला जवळ येऊ दिले नाही. जेव्हा त्याला संशय आला तेव्हा तिची वैद्यकीय तपासणी केली, त्या वैद्यकीय तपासणीत ती किन्नर असल्याचे समोर आले. या युवकाच्या नातेवाईकांनी त्या मुलीच्या माहेरच्यांवर फसवणूक करुन एका किन्नरशी लग्न करून दिल्याचा आरोप केला.
तिने पोलिसांना बोलावून तिच्या सासरच्यांनी तिला कोंडून ठेवल्याची तक्रार केली. पोलिसांनी मुलगी व तिच्या सासरच्या माणसांना पोलीस ठाण्यात आणले. याबद्दल पोलिसांनी सर्व माहिती घेतली. या युवकाच्या कुटुंबियांनी वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे पोलिसांकडे सादर करून तिला घरात ठेवण्यास नकार दिला. यानंतर ती तिच्या नातेवाईकांसह निघून गेली.
या युवकाच्या नातेवाईकांनी सांगितले की, लग्नाच्या वेळी किन्नर असल्याची गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. असा आरोप आहे की, जेव्हा त्या युवकाने तिला घटस्फोट घेण्यास सांगितले तेव्हा तिने नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती.