मुक्तपीठ टीम
डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची १ नोव्हेंबर २०२२ ला ७७ वी जयंती आहे. सध्या ‘दाभोलकर खून खटला’ एवढ्यापुरतचं दाभोलकरांविषयीचं मुख्य माध्यमांमधील कव्हरेज मर्यादित आहे. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्यापाठोपाठ गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या.
दाभोलकरांविषयीच बोलायचं तर त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. ते दूर व्हावेत, दाभोलकर व्यक्ती, कार्य आणि विचार लोकांपर्यंत विशेषत: तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी एक नवीन उपक्रम घेवून येत आहोत. सर जे जे काॅलेज ऑफ आर्ट, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाप्रकारांच्या माध्यमातून हे अभीव्यक्त केलं आहे. ‘कसोटी विवेकाची’ / We are on trial नावाच्या कला प्रदर्शनातून हे सादर होत आहे. या प्रदर्शनाची संकल्पना आणि आयोजन ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ ग्रुपने केले आहे.
प्रसिद्ध अभिनेते नसिरूद्दीन शहा यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन येथे होणार आहे. डॉ दाभोलकर यांच्या पत्नी डाॅ. शैला दाभोलकर आणि जे. जे काॅलेज ऑफ आर्टचे आणि महाराष्ट्राचे कला संचालक प्रा. विश्वनाथ साबळे आणि एडव्होकेट अभय नेवगी यांच्या प्रमुख पाहुणे असणार आहेत. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अवश्य यावं हे आग्रहाचं निमंत्रण.
२८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे कलाप्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. पत्ता – यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयाच्या समोर, सचिवालय जिमखानाशेजारी. नरिमन पाॅईंट – ४०००२१.
आपल्या परिचयातील विद्यार्थी आणि युवकांना हे निमंत्रण नक्की पाठवा.